Parbhani News : यंदाच्या (२०२३-२४) रब्बी हंगामात शुक्रवार (ता.१८) पर्यंत परभणी जिल्ह्यात २ लाख ८९ हजार ४०७ हेक्टर (१०६.८७ टक्के) व हिंगोली जिल्ह्यात २ लाख १० हजार ८१४ हेक्टर (११९.१८ टक्के) अशी दोन जिल्ह्यांत मिळून एकूण ५ लाख २२१ हेक्टरवर पेरणी झाली आहे.
या दोन जिल्ह्यांत नोव्हेंबर महिन्याअखेरीस झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे निर्माण झालेल्या ओलाव्यामुळे रब्बीचा पेऱ्यात वाढ झाली आहे.
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सरासरी २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर असताना शुक्रवार (ता. १८) पर्यंत २ लाख ८९ हजार ४०७ हेक्टरवर (१०६.८७ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात रब्बी ज्वारीची १ लाख १३ हजार ८९ पैकी १ लाख ८ हजार ५८७ हेक्टरवर (९६.०२ टक्के), गव्हाची ३९ हजार ३०८ पैकी २६ हजार ४२९ हेक्टर (६७.२४ टक्के), मक्याची २ हजार ८६ पैकी ९६४ हेक्टर (४६.२१ टक्के) पेरणी झाली आहे.
हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख १२ हजार १७० असतांना १ लाख ५१ हजार ३१ हेक्टर (१३४.६४ टक्के), तर करडईची ३ हजार ३७१ पैकी २ हजार २३ हेक्टर (६०.०१ टक्के), जवसाची ११९ पैकी १७ हेक्टर (१४.२९ टक्के), तिळाची ३३.६४ पैकी ३१ हेक्टर (९२.१५ टक्के), सूर्यफुलाची २६.२ पैकी २ हेक्टर (७.६८ टक्के) पेरणी झाली आहे.
हिंगोली जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख १० हजार ८१४ हेक्टर असताना शुक्रवार (ता. १८)पर्यंत २ लाख १० हजार ८१४ हेक्टर (११९.१८ टक्के) पेरणी झाली आहे. त्यात ज्वारीचे सरासरी क्षेत्र ११ हजार ६९७ हेक्टर असताना १६ हजार ८९९ हेक्टर (१४४.४७ टक्के),
गव्हाची ४२ हजार ५०५ पैकी ३४ हजार ४७३ हेक्टर (८१.१० टक्के), मक्याची ९७१ पैकी ६०९ हेक्टर (६२.७२ टक्के) पेरणी झाली. हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र १ लाख २० हजार १४७ हेक्टर असताना १ लाख ५६ हजार ७५० हेक्टर (१३०.४६ टक्के),
करडईचे सरासरी क्षेत्र २०५ हेक्टर असताना १ हजार ५७८ हेक्टर (७६७.२९ टक्के) पेरणी झाली. तिळाची १८.६६ पैकी ४९ हेक्टर (२६२.५९ टक्के) पेरणी झाली आहे. २०२३ च्या ऑक्टोबरमध्ये पाऊस नसल्यामुळे जमिनीत पेरणी योग्य ओलावा नव्हता.
त्यामुळे या दोन जिल्ह्यांतील जिरायती क्षेत्रातील मोठे क्षेत्र नापेर राहिले होते. मॉन्सूनोत्तर पावसामुळे काही भागांत उभ्या खरीप तसेच रब्बी पिकांचे नुकसान झाले. परंतु ओलावा उपलब्ध झाल्यामुळे नापेर क्षेत्रावर पेरणी करता आली. परिणामी, रब्बीचा पेरा वाढला आहे.
तालुकानिहाय पेरणी स्थिती (हेक्टरमध्ये) (शुक्रवारी ता. १८ पर्यंत)
तालुका सरासरी क्षेत्र पेरणी क्षेत्र टक्केवारी
परभणी ५७९०० ५६७८२ ९८.०७
जिंतूर ५३७३० ६४२७२ ११९.६२
सेलू ३३५६१ २६१०१ ७७.७७
मानवत १६११९ २१०७२ १३०.७३
पाथरी १७०७२ १९०३९ १११.५२
सोनपेठ १५६९८ १४३२९ ९१.२८
गंगाखेड ३२०८६ २९०८७ ९०.६५
पालम २०१३० १९२६८ ९५.१८
पूर्णा २४४९५ ३९४५७ ११९.६२
हिंगोली ३१०७४ ३५२३८ ११३.४०
कळमनुरी ५०१४६ ५३०७७ १०५.८४
वसमत ४२०१९ ४६३०४ ११०.२०
औंढा नागनाथ २५७२६ ४१०६० १५९.६०
सेनगाव २७९२४ ३५१३५ १२५.८२
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.