Cotton Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ५० हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान

Post Monsoon Crop Damage : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा कपाशी व तूर या पिकांना जोरदार फटका बसला आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

Parbhani News : नोव्हेंबर महिन्यात झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसाचा कपाशी व तूर या पिकांना जोरदार फटका बसला आहे. परभणी जिल्ह्यातील ३३ हजार २२६ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील १७ हजार २८३ हेक्टर असे दोन जिल्ह्यातील मिळून एकूण ५० हजार ५०९ हेक्टरवरील कपाशीचे ३३ टक्के पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.

तसेच परभणी जिल्ह्यातील १२ हजार ५१५ हेक्टर व हिंगोली जिल्ह्यातील २१ हजार ४५७ हेक्टर मिळून एकूण हेक्टरवरील तूर पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. परभणी जिल्ह्यात २०२३ मधील नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात वादळी वाऱ्यासह जोरदार मॉन्सूनोत्तर पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील २३ मंडलांत अतिवृष्टी झाली.

Crop Damage
Cotton Crop Damage : कापूस पिकाची वाताहत

इतरही मंडलांत जोरदार पाऊस झाला. खरीप व रब्बीतील मिळून एकूण ९५ हजार हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचे स्पष्ट झाले. त्यात कपाशीचे बाधित क्षेत्र ३३ हजार २२६ हेक्टर व तुरीचे बाधित क्षेत्र १२ हजार ५१५ हेक्टर आहे आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हिंगोली जिल्ह्यातील सर्व पाच तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस झाला.

जिल्ह्यातील १२ मंडलांत अतिवृष्टी झाली, तसेच इतरही मंडलांत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. त्यामुळे २ लाख ४० हजारांवर हेक्टरवरील शेतीपिकांचे ३३ टक्के अधिक नुकसान झाले. त्यात कपाशीचे बाधित क्षेत्र १७ हजार २८३ हेक्टर, तर तूर पिकाचे बाधित क्षेत्र २१ हजार ४५७ हेक्टर आहे.

Crop Damage
Cotton Crop Damage : कापसाच्या वाती, माती मिश्रित कापसाला फुटले कोंब

कपाशी पीक नुकसान क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका नुकसान क्षेत्र

परभणी ९८४७

जिंतूर २९२०

सेलू २४७७

मानवत ४४५२

पाथरी २२३६

सोनपेठ ९५७

गंगाखेड ७२५

पालम ३९००

पूर्णा ५७१५

हिंगोली ३६७७

कळमनुरी ३५००

वसमत १६१८

औंढा नागनाथ ५८००

सेनगाव २६८८

मॉन्सूनोत्तर पाऊस तूर पीक नुकसान क्षेत्र स्थिती (हेक्टरमध्ये)

तालुका नुकसान क्षेत्र

परभणी १५०६

जिंतूर ५९२९

सेलू १०३३

पाथरी ३००

सोनपेठ २५४

पालम १४००

पूर्णा २०९३

हिंगोली ६४००

कळमनुरी २०००

वसमत ७९४

औंढा नागनाथ २३७०

सेनगाव ९८९३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com