Nashik News: इराण-इस्राईल संघर्ष चिघळत असल्याने आखाती देशांकडे होणाऱ्या नाशिवंत शेतीमाल निर्यातीचा प्रश्न गंभीर बनला आहे. कांदा, केळी, लिंबू, हिरवी मिरची, शेवगा तसेच द्राक्ष या मालांवर त्याचा थेट परिणाम होत असून, निर्यात साखळी विस्कळीत झाली आहे. निर्यातदारांनी सध्या सावध भूमिका घेतली असली, तरी आधीच पाठविलेल्या मालाचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे..बुधवारी (ता. ४) बंदर पूर्ववत होण्याची अपेक्षा होती; मात्र अमेरिका-इस्राईल आणि इराणमधील संघर्ष तीव्र झाल्याने अनिश्चितता कायम आहे. आखाती देशांकडे होणारी नाशिवंत शेतीमाल निर्यात अडचणीत आल्याचे ‘हॉर्टिकल्चर प्रोड्यूस एक्स्पोर्ट्स असोसिएशन’चे उपाध्यक्ष विकास सिंह यांनी ‘ॲग्रोवन’शी बोलताना सांगितले..India Gulf Export: भारतातून आखाती देशांना निर्यात ठप्प.जवाहरलाल नेहरू पोर्ट ॲथॉरिटी (जेएनपीए) बंदरावर सुमारे ३०० कंटेनर अडकले आहेत. नाशिवंत शेतीमाल खराब होऊ नये म्हणून हे कंटेनर ‘प्लग-इन’ (रेफ्रिजरेशन) स्थितीत ठेवावे लागत आहेत. प्रत्येक कंटेनरसाठी दररोज सुमारे दहा ते बारा हजार रुपये खर्च येत आहे. परिस्थिती आणखी दोन-तीन दिवस कायम राहिल्यास माल उतरवून घ्यावा लागू शकतो. त्यानंतर प्रतिकंटेनर पाच ते सहा हजार रुपये अतिरिक्त खर्च वाढण्याची शक्यता आहे. कांदा व केळी निर्यातीवर परिणाम अधिक असून, द्राक्षांवरील परिणाम तुलनेने कमी असल्याचे निर्यातदारांनी सांगितले..बुकिंग-लोडिंगवर अधिभारमध्यपूर्वेतील तणावामुळे जहाज वाहतूक कंपन्यांनी ३ मार्चपासून पुढील सूचना मिळेपर्यंत आपत्कालीन अधिभार लागू केला आहे. इराक, बहरीन, कुवेत, येमेन, कतार, ओमान, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जॉर्डन, इजिप्त, जिबूती आणि सुदान येथे जाणाऱ्या शिपमेंटवर हा अधिभार लागू असेल. नव्या बुकिंग, लोडिंगवर वाढीव दर आकारले जाणार असून, वाहतूक खर्चात चौपट वाढ झाली आहे..Agricultural Export Crisis: कांदा, द्राक्ष, केळीची निर्यात ठप्प.आपत्कालीन अधिभारकंटेनर प्रकार अधिभार दर (डॉलर)२० फूट ड्राय कंटेनर २०००४० फूट ड्राय कंटेनर ३०००रेफर किंवा विशेष उपकरणांसाठी ४०००.द्राक्षांच्या तुलनेत कांदा व केळीचे नुकसान मोठे आहे. निर्यातीसाठी पॅकिंग जवळपास थांबविले आहे. ‘अपेडा’कडे पत्रव्यवहार सुरू आहे. बंदरावर अडकलेल्या कंटेनरचा खर्च वाढत असल्याने सरकारने धोरणात्मक मदत करावी.लक्ष्मण सावळकर, शेतीमाल निर्यातदार, नाशिक.तणावपूर्ण परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय व्यापार, जलमार्ग, विमा प्रीमिअम आणि पेमेंट व्यवहारांमध्ये अनिश्चितता निर्माण झाली आहे. निर्यातीसाठी विशेष प्रोत्साहन पॅकेज जाहीर करावे.भास्कर भगरे, खासदार, दिंडोरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.