Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : जळगावात रब्बीचा पेरा तीन लाख हेक्टरवर

Rabi Season : सध्या पहाटे, रात्री थंडी असते. दिवसा उन्हाची तीव्रता असते. रब्बीला चांगले पोषक वातावरण आहे.

Team Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात यंदा १३९ टक्के पाऊस झाला आहे. ऑक्टोबर व डिसेंबरमध्येही दमदार पाऊस झाला. यामुळे थंडीचा कडाका यंदा चांगला होता. सध्या पहाटे, रात्री थंडी असते. दिवसा उन्हाची तीव्रता असते. रब्बीला चांगले पोषक वातावरण आहे. यामुळेच रब्बीच्या पेरणी क्षेत्रात तब्बल ७१ हजार हेक्टरने पेरा वाढला आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात २ लाख ४१ हजार ५८६ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली होती. तर यंदा जिल्ह्यात ३ लाख १२ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीचा पेरा झाला आहे. सरासरी क्षेत्र पाहता यंदा १२९ टक्के पेरणी झाली आहे. जिल्ह्यात रब्बी हंगामाच्या पेरण्या १५ जानेवारीपर्यंत पूर्ण झाल्या असून, याचा अंतिम पेरणी अहवाल कृषी विभागाकडे आला आहे. मका, ज्वारीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले असून, गव्हाचे क्षेत्र मात्र कमी झाले आहे.

क्षेत्रही वाढले

गव्हाचे क्षेत्र गेल्या वर्षी ६० हजार ६८४ हेक्टर होते. यावर्षी ते ६० हजार २०० हेक्टरवर गव्हाचा पेरा झाला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत मक्याचे क्षेत्र तब्बल ३५ हजार हेक्टरने वाढला आहे. यंदा १ लाख २ हजार ७९२ हेक्टरवर मका पेरला गेला आहे. ज्वारीचे क्षेत्र देखील ११ हजार हेक्टरने वाढले असून, यंदा शेतकऱ्यांनी ५० हजार ५८६ हेक्टरवर ज्वारी पेरली आहे. हरभरा देखील २८ हजार हेक्टरने वाढला आहे. यंदा ९८ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.

रब्बीवर विश्वास

यंदा अती पावसामुळे खरीप हंगामाच्या कापसाला फटका बसला आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कापूस उपटून रब्बी हंगामातील पिकांची पेरणी केली आहे. नोव्हेंबर महिन्यातील अती पावसाने सोयाबीन, कापूस या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे शेतकरी कापसाचे उत्पन्न घेणे टाळले आहे.

रब्बीचा पेरा यंदा ७१ हजार हेक्टरवर वाढला आहे. यंदा शंभर टक्क्यांपेक्षा अधिक झालेला पावसाने, जमिनीत चांगली ओल आहे. थंडीचा कडाकाही वाढला होता. यामुळे रब्बीचा पेरा वाढला आहे. रब्बीचे उत्पादन वाढणार आहे.
- के. एम. तडवी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT