Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : मराठवाड्यात ६ लाख ८१ हजार हेक्टरवर रब्बी पेरणी

Rabi Season : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (ता. ७) सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६ लाख एकूण हजार ९४४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली.

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत गुरुवारपर्यंत (ता. ७) सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६ लाख एकूण हजार ९४४ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील तीन जिल्ह्यांत सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत आतापर्यंतच्या रब्बी पेरणीचा टक्का ३९.७४ इतका राहिला. तर लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत सरासरी क्षेत्राच्या तुलनेत २८.४० टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वसाधारण १ लाख ९० हजार ९३५ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २६,३६७ हेक्टरवर रब्बी पेरणी झाली. जालना जिल्ह्यात सर्वसाधारण २ लाख १७ हजार ८९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ८५ हजार ५६२ हेक्टरवर पेरणी आटोपली. तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण ३ लाख ३२ हजार ३५३ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत १ लाख ८२ हजार ६०० हेक्टर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत सुमारे ५४.९४ टक्के पेरणी आटोपली आहे.

लातूर विभाग

लातूर विभागाचे रब्बी हंगामातील सरासरी क्षेत्र १३६३९३० हेक्टर असून, प्रत्यक्ष पेरणी ३८७४१५ हेक्टरवर पेरणी झाली आहे. म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या २८.४० टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

लातूर विभाग पीकनिहाय स्थिती

रब्बी ज्वारी : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख ७१ हजार ८५७ हेक्टर असून, आतापर्यंत १०१२४१.८० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी २७.२३ टक्के आहे. पीक सध्या वाढीच्या अवस्थेत असून, धाराशिव जिल्ह्यात काही ठिकाणी अल्प प्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

गहू : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५६ हजार ५१९ हेक्टर असून, आतापर्यंत १३ हजार ५६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ८.६७ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

हरभरा : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ७ लाख ८६ हजार १२४ हेक्टर असून, आतापर्यंत २ लाख ५९ हजार ५१९.५० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. त्याची टक्केवारी ३३.०१ टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

करडई : पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र १९ हजार ५३१ हेक्टर असून, आतापर्यंत ८००८.४० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली असून, त्याची टक्केवारी ४१.०० टक्के आहे. पीक सध्या उगवणीच्या अवस्थेत आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभाग

रब्बी ज्वारी : विभागातील तीनही जिल्ह्यांत रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ३ लाख २ हजार १३८ हेक्टर त्या तुलनेत १ लाख ५९ हजार २५२ हेक्टरवर ज्वारी पेरणी झाली आहे.

गहू : गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५७ हजार ११६ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ १४ हजार ५६५ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली.

मका : मका पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र ३८ हजार २४७ हेक्टर असताना प्रत्यक्षात १० हजार ७१३ हेक्टर वरच मकाची लागवड झाली आहे.

हरभरा : या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख ३६ हजार ८४१ हेक्टर आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख २४७ हेक्टरवरच हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

करडई : या पिकाचे सर्वसाधारण क्षेत्र २६३८ हेक्टर असताना प्रत्यक्षात केवळ १३४ हेक्टरवरच करडईची पेरणी झाली आहे.

सूर्यफूल : सर्वसाधारण क्षेत्र २८४ असताना प्रत्यक्षात केवळ ५७ हेक्टर वरच सूर्यफुलाची पेरणी झाली.

इतर गळीतधान्य: सर्वसाधारण क्षेत्र ८३३ हेक्टर असताना प्रत्यक्षात २६० हेक्टरवरच पेरणी झाली.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना

विभागात अतिवृष्टीमुळे ज्वारी, सोयाबीन व कापूस पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. चालू खरीप हंगामातील तूर पीक वाढीच्या अवस्थेत आहेत. कापूस पीक काढणी अवस्थेत असून, पहिली वेचणी सुरू आहे. विभागातील लातूर व धाराशिव जिल्ह्यात सॅम्पल सर्वे पूर्ण असून नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत सोयाबीन, तूर व कापूस पिकांसाठी मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती अधिसूचना काढण्यात आलेली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Temperature Rise Problem : तापमानवाढ नियंत्रणासाठी कधी एकत्र येणार?

Pimpalgaon Joge Canal : पिंपळगाव जोगे धरणाच्या कालव्याची दुरवस्था

Sharad Pawar : राज्यात कोणी दाब दडपशाही करत असेल तर ते खपवून घेणार नाही : शरद पवार

Cotton Market : बारामती बाजार समितीत शनिवारपासून कापूस विक्री

Devendra Fadnavis : आमचे सरकार आले तर पूर्ण कर्जमाफी देणार : फडणवीस

SCROLL FOR NEXT