Rabi Sowing : शेतशिवारात रब्बीच्या पेरणीची लगबग

Agriculture Update : जळकोट तालुक्यात परतीच्या पावसाने शेतात तण, गवत वाढल्याने शेती पडीक पडल्यासारखी झाली आहे.
Rabi Season
Rabi SeasonAgrowon
Published on
Updated on

Latur News : जळकोट तालुक्यात परतीच्या पावसाने शेतात तण, गवत वाढल्याने शेती पडीक पडल्यासारखी झाली आहे. दरम्यान, अशातच शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पेरणीला सुरवात केली. तालुक्यातील ठिकठिकाणच्या शेतशिवारात सध्या पेरणीची लगबग सुरू असल्याचे चित्र आहे.

या डोंगरी तालुक्यात रब्बीचे पेरणीक्षेत्र अत्यल्प आहे. सिंचनाची व्यवस्था नसल्यामुळे तसेच हलक्या प्रतीची डोंगराळ जमीन असल्याने रब्बी येणे कठीण आहे. केवळ वीस ते पंचवीस टक्के रब्बी पेरणी करण्यासारखे क्षेत्र असल्याचे चित्र आहे. अलीकडे बैलजोडीऐवजी अनेक जण ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणीला पसंती देत आहेत.

Rabi Season
Seed For Rabi Season : रब्बीसाठी साडेपाच लाख बियाणे कीट वाटणार

रब्बीच्या पेरणीसाठी उशीर होत आहे. गेल्या आठवड्यापासून उघडीप दिल्याने शेतकरी गवताच्या शेतात बैलजोडीच्या साहाय्याने मेहनत व पेरणी करण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र, काही ठिकाणी जमिनीतला ओलावा हटत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

बैलजोडीच्या साहाय्याने उशीर होत असल्याने गवताच्या शेतात रब्बीच्या पेरणीची मूठ आवळली आहे. तालुक्यात परतीच्या पावसाने खरिपाची पिके तर गेलीच. पण, जमिनीत तण, गवत वाढल्यामुळे शेतीला अवकळा प्राप्त झाली आहे. रब्बीची पेरणी वेळेवर करण्यासाठी शेतकऱ्यांनी तण, गवतावर तणनाशकाची फवारणी केली तरीसुद्धा गवतावर काहीच परिणाम झाला नाही.

Rabi Season
Rabi Season : निपाणी तालुक्यात रब्बी हंगामातील पेरणीची लगबग

हलक्या प्रतीच्या जमिनीतीला ओलावा वाळल्यामुळे कोरडवाहू पेरणीने काही साध्य होणार नाही असे शेतकरी सांगत आहेत. तर, चांगल्या प्रतीच्या शेतीत ओलावा असल्यामुळे बैलजोडीच्या साहाय्याने शेतकरी ज्वारीची पेरणी करत असून हरभरा पेरणीकडे मेहनत करणे शक्य नसल्याने ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती दुरुस्त केली जाते.

शेती पेरणीयोग्य तयार होत नसल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. निसर्गाच्या अवकृपेने परतीच्या पावसाने शेतीची दैना झालेली आहे. रब्बीच्या पेरणीच्या वेळेत शेत दुरुस्त करण्याची वेळ यंदा शेतकऱ्यांवर आली आहे.सध्या तुरळक शेतकऱ्यांनी रब्बी पेरणी काही प्रमाणात केली असल्याचेही चित्र आहे.

अनेकांचा ऊस लागवडीकडेही कल

तालुक्यात नदीपात्र, तलावालगतच्या शेतासह सिंचनाची सोय असणाऱ्या शेतकऱ्यांकडून रब्बी पेरणीची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. तर, ज्या शेतकऱ्याकडे मुबलक पाणीसाठा आहे अशा काही शेतकऱ्यांचा ऊस लागवडीकडे कल आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com