Rabi Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीच्या पेरण्यांची मंदगती

Rabi Season : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या सध्या मंद गतीने सुरू आहे.

Team Agrowon

Latur News : कृषी विभागाच्या लातूर विभागातील लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली व नांदेड या पाच जिल्ह्यातील रब्बीच्या पेरण्या सध्या मंद गतीने सुरू आहे. अतिवृष्टीचा पाऊस आणि उन्हाच्या कडाक्यात एकीकडे सोयाबीनची काढणी करत दुसरीकडे रब्बीच्या पेरण्यांसाठी मशागतीची कसरत शेतकऱ्यांना करावी लागत आहे.

मागील आठवड्यात सतत पाऊस झाल्यामुळे पेरण्या रखडल्या होताय. या आठवड्यात पेरण्यांना वेग येण्याची शक्यता असून आतापर्यंत जिल्ह्यात १३ लाख ६३ हजार ९६० पैकी २२ हजार ९९१ हेक्टरवर (१.६९ टक्के) रब्बीच्या पेरण्या झाल्या आहेत. गेल्या आठवड्यात ढगाळ व उष्ण हवामान होते. कोजागिरी पौर्णिमेनंतर धुक्के येऊन थंडीने हिवाळ्याची चाहूल लागते. मात्र, अजून थंडीची चाहूल न लागल्याने हिवाळा सुरू झाल्यासारखी परिस्थिती नाही.

मागील आठवड्यात ठिकठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. पाऊस सोडला तर या आठवड्यातही उष्ण वातावरण कायम आहे. अतिवृष्टीमुळे ज्वारी, सोयाबीन व कापूसाचे मोठे नुकसान झाले असून या पिकांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. सध्या खरीपातील तुर वाढीच्या अवस्थेत असून सोयाबीनची काढणी ९० टक्के झाली आहे.

कापूस पिक बोंडे पक्वतेच्या अवस्थेत असले तरी काही भागात कापसाच्या पहिल्या वेचणीलाही सुरवात झाली आहे. कापसावर काही ठिकाणी किडीचा प्रादुर्भाव दिसत आहे. सखल भागात पाणी साचल्यामुळे तुरीचे पिक पिवळे पडले असून काही ठिकाणी तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. खरीप ज्वारीचे पिक पक्वतेच्या अवस्थेत असून बाजरी पिक कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे.

दुसरीकडे रब्बीच्या पेरण्यांसाठी शेतकऱ्यांनी मशागतीच्या कामाला वेग दिला आहे. ढगाळ वातावरणासह पाऊस व कडक उन्हाचाही अडथळा पेरण्यांना येत आहे. या स्थितीत ऊस लागवडीसोबत खरीपाच्या पेरण्यांची तयारी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात पेरण्यांना चांगला वेग येण्याची शक्यता दिसत आहेत.

आतापर्यंत झालेल्या पेरण्यांत परभणी जिल्हा आघाडीवर असून या जिल्ह्यात पाच टक्क्याच्या पुढे पेरण्या झाल्या आहेत. हिंगोली जिल्ह्याचा दुसरा क्रमांक आहे. आतापर्यंत रब्बी ज्वारीची सर्वसाधारण तीन लाख ७१ हजार ८५७ पैकी ११ हजार ७०९ हेक्टरवर (३.१५ टक्के) पेरणी झालेली आहे.

गव्हाची एक लाख ६५ हजार १९ पैकी १६० (०.१० टक्के) हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभराची सात लाख ८६ हजार १२४ पैकी दहा हजार ४०५ (१.३२ टक्के) हेक्टवर पेरणी झालेली आहे. करडईची १९ हजार ५३१ पैकी केवळ २५५ (१.३१ टक्के) पेरणी झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fruit Crop Insurance GR: फळपीक विम्याच्या 'आंबिया बहार'साठी १२९ कोटी निधी मंजूर, शासन निर्णय जारी

Heavy Rainfall: जळगाव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

Public Issues: सामान्य जनतेची अडवणूक खपवून घेणार नाही: आमदार सुभाष देशमुख

Maharashtra Rain Forecast: कोकण, घाटमाथ्यासह विदर्भात पावसाची शक्यता

Agrowon Podcast: गहू दरात चढ-उतार, सोयाबीन आवकेत वाढ, काकडी दर स्थिर, लिंबू दरात घसरण तर कोथिंबीर दरात बदल

SCROLL FOR NEXT