Rabi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बी पेरणीला वेग, हरभऱ्याची लागवड जोरात

Chana Cultivation : रब्बी हंगामातील पिकांना जिल्‍‍ह्यात वेग आला असून आजवर हरभऱ्याची सर्वाधिक ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे.

Team Agrowon

Akola News : रब्बी हंगामातील पिकांना जिल्‍‍ह्यात वेग आला असून आजवर हरभऱ्याची सर्वाधिक ३५ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत विविध पिके मिळून ४१ हजार हेक्टरपर्यंत लागवड पोचली आहे. सरासरीच्या ३५ टक्क्यांपर्यंत ही लागवड झालेली आहे.

रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांच्या लागवडीला जिल्ह्यात सध्या सर्वत्र वेग आला. रब्बीत हरभऱ्याची लागवड सर्वाधिक क्षेत्रावर होत असते. जिल्ह्यात हरभऱ्याचे सरासरी क्षेत्र एक लाख हेक्टरवर आहे. यंदा परतीचा पाऊस चांगला झाला. जमिनीत अद्यापही ओल आहे.

शिवाय प्रकल्प तुडूंब भरलेले असल्याने सिंचनासाठी पाण्याची व्यवस्थासुद्धा आहे. यामुळे रब्बीत हरभऱ्याची लागवड या सरासरीपेक्षा अधिक होईल असा अंदाज आहे. गव्हाचेही १९ हजार २४० हेक्टर हे सरासरी क्षेत्र आहे. खारपाण पट्ट्यात कालव्याच्या सिंचनावर आधारित गहू लागवड दर वर्षी वाढत आहे.

येत्या काळात गव्हाची पेरणी होऊ शकते. आजवर १९२४० हेक्टरपैकी ४५४० हेक्टर म्हणजेच सरासरीच्या २५ टक्क्यांपर्यंत लागवड झालेली आहे. अकोल्यात रब्बी ज्वारीचे क्षेत्र मागील काही हंगामात विस्तारत चालले आहे. सरासरी ९११ हेक्टरच्या तुलनेत दरवेळी अधिक क्षेत्रावर पेरणी होत आलेली आहे.

यंदा आतापर्यंत तीनशे हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र रब्बी ज्वारीच्या लागवडीखाली आलेले आहे. मक्याची लागवड जिल्ह्यात तुलनेने कमी राहते. आजवर ३० हेक्टर मका क्षेत्रावर पेरणी आटोपली. करडईचे २६३ हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत पाच हेक्टरवर पेरणी आटोपली आहे.

बाजारात हरभऱ्याच्या ९२१८ वाणाची चलती

बाजारपेठेत आढावा घेतला असता शेतकऱ्यांकडून हरभऱ्याच्या ९२१८ या वाणाचीच अधिकाधिक मागणी होत आहे. या भागात हा वाण पोषक बनलेला आहे. बाजारात विविध प्रकारचे पर्यायी वाण उपलब्ध असले तरी सर्वाधिक विक्री जॅकी ९२१८ वाणाचीच होत असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Seed Bill 2025 : वीज सुधारणा आणि बियाणे विधेयकाच्या विरोधात एसकेएमचे ८ डिसेंबरला आंदोलन

Irrigation Projects: सिंचन प्रकल्पांत जलसाठा ८० टक्क्यांवर

Onion Storage Subsidy: कांदा चाळीसाठी प्रतिटन चार हजारांचे अनुदान

District Development: वाशीमच्या सर्वांगीण विकासाला गती द्या; कुंभेजकर

Healthcare Service: रुग्णालयांनी पारदर्शक आरोग्यसेवा उपलब्ध करून द्यावी: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

SCROLL FOR NEXT