Yavatmal News: भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) कापूस खरेदीची मुदत संपल्याने जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. आता स्लॉट बुकिंगही होणार नसल्याचे स्पष्ट झाले असून, सुमारे ४० हजार शेतकरी अजूनही कापूस विक्रीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे कापूस विकायचा कुठे, असा संतप्त सवाल शेतकरी उपस्थित करीत आहेत..यंदा जिल्ह्यात अंदाजे ५ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली होती. अतिवृष्टीचा फटका बसल्याने उत्पादनात काही प्रमाणात घट झाली असली तरी मोठ्या प्रमाणावर कापूस अजूनही शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हमीभाव मिळेल या अपेक्षेने शेतकऱ्यांनी ‘सीसीआय’च्या खरेदी केंद्रावर मोठ्या प्रमाणात नोंदणी केली होती..Cotton Procurement: परभणी, हिंगोलीत १९.१६ लाख क्विंटलवर कापूस खरेदी.उपलब्ध माहितीनुसार, जिल्ह्यातील १ लाख ४८ हजार शेतकऱ्यांनी कापूस विक्रीसाठी नोंदणी केली होती. मात्र खरेदी प्रक्रियेचा वेग अत्यंत मंद राहिल्याने अनेकांना स्लॉट मिळालेच नाहीत. जिनिंग केंद्रांवर दररोज केवळ ३०० ते ६०० क्विंटल कापसाचे स्लॉट बुकिंग होत असल्याने हजारो शेतकरी वेटिंगवर गेले होते..सध्या खुल्या बाजारात कापसाला ५५०० ते ७००० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. हमीभावाच्या तुलनेत हा दर कमी असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. नोंदणी करूनही कापूस विक्रीची संधी न मिळालेल्या या हजारो शेतकऱ्यांसमोर आता मोठे संकट उभे राहिले आहे. ‘सीसीआय’ची खरेदी मुदत संपल्यानंतर प्रतीक्षेत असलेल्या या ४० हजार शेतकऱ्यांच्या कापसाचे काय होणार, असा सवाल शेतकरी संघटनांकडून उपस्थित केला जात असून शासनाने तातडीने हस्तक्षेप करून खरेदी पुन्हा सुरू करावी, अशी मागणी होत आहे..Cotton Bag Scam: कापूस पिशव्यांच्या खरेदीत गैरव्यवहार, चौकशी अहवाल कृषी आयुक्तालयास सादर.यवतमाळ हा कोरडवाहू कापूस उत्पादक भाग म्हणून ओळखला जातो. पावसाच्या पाण्यावर कापसाचे उत्पादन होत असल्याने अनेकदा फूल आणि बोंड धरण्याच्या काळात पावसाचा खंड पडत असल्याने गेल्या काही वर्षांत उत्पादकतेला फटका बसत आहे. कापूस पिकाकरिता पाऊस हा एकदाच धोधो न पडता समप्रमाणात पडायला हवा, असे तज्ज्ञ सांगतात..यंदाची कापूस खरेदी शेतकऱ्यांसाठी जणू अडथळ्यांची शर्यत ठरली. कपास किसान ॲपवर नोंदणीची सक्ती शेतकऱ्यांना सुरुवातीला करण्यात आली होती. पहिल्यांदाच अशा प्रकारचे ॲप ‘सीसीआय’कडून विकसित करण्यात आले. या ॲपवर नोंदणी करताना अनेक अडचणींचा सामना शेतकऱ्यांना करावा लागला. दुसऱ्या टप्प्यात स्लॉट बुकिंगच्या प्रक्रियेत समस्या उद्भवल्या. आता खरेदीची मुदत संपल्याने उर्वरित चाळीस हजारांवर शेतकऱ्यांचे काय, हा प्रश्न कायम आहे.मनीष जाधव, प्रदेश प्रवक्ता, स्वाभिमानी शेतकरी संघटना.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.