Jalna News : जिल्ह्यात रब्बीच्या सरासरी २ लाख १७ हजार ८९२ हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत २१ नोव्हेंबर अखेरपर्यंत १ लाख १७ हजार ६९६ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे सरासरी क्षेत्राच्या तुलनेत ५४.२ टक्के क्षेत्रावर रब्बीची पेरणी आटोपली आहे. जालना जिल्ह्यातील आतापर्यंतच्या रब्बी पेरणीत शेतकऱ्यांनी ज्वारी, हरभरा, मका तसेच काही प्रमाणात गव्हाच्या पेरणीला प्राधान्य दिले आहे.
पीकनिहाय पेरणी झालेली क्षेत्र
रब्बी ज्वारी : जालना जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सरासरी क्षेत्र ८६ हजार ९३८.६४ इतके आहे. या क्षेत्राच्या तुलनेत ज्वारीची ५३३३२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
गहू : जालना जिल्ह्यात गव्हाचे सरासरी क्षेत्र ४८ हजार २०९ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत गव्हाची १३ हजार ७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
मका : जालना जिल्ह्यात मकाचे सरासरी क्षेत्र १३ हजार २६६ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत मकाची ८५६७ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे.
हरभरा ः जालना जिल्ह्यात हरभरा पिकाचे सरासरी क्षेत्र ६७ हजार ६५५ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत ४१ हजार ७५० हेक्टर क्षेत्रावरच हरभऱ्याची पेरणी झाली आहे. करडई : जालना जिल्ह्यात करडईचे सरासरी क्षेत्र ११६५.८६ हेक्टर इतके आहे. त्या तुलनेत केवळ ८६ हेक्टर क्षेत्रावरच करडईची पेरणी झाली आहे.
सूर्यफूल : जालना जिल्ह्यात सूर्यफुलाचे सरासरी क्षेत्र ५३.२ हेक्टर इतके असून त्या तुलनेत केवळ ७ हेक्टर क्षेत्रावरच सूर्यफुलाची पेरणी झाली आहे. जवस : जालना जिल्ह्यात जवसाचे सरासरी क्षेत्र १५.३२ हेक्टर इतकी असली तरी जवसाची अजून पेरणी झालेली नाही.
इतर तृणधान्य, कडधान्य, गळीतधान्य : जालना जिल्ह्यात इतर तृणधान्यांची १३८ हेक्टरवर, गळीत धान्याची २२ हेक्टरवर, तर इतर कडधान्यांची अजून पेरणीचे झाली नसल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.
कपाशीची दुसरी, तिसरी वेचणी
जालना जिल्ह्यात कपाशीची सरासरी ३९९ हजार हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत दोन लाख ९१ हजार हेक्टरवर लागवड झाली होती या कपाशी पिकाची काही ठिकाणी दुसरी, तर काही ठिकाणी तिसरी वेचणी सुरू आहे. तुरीचे सरासरी क्षेत्र ५३ हजार ३४६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ४९ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर तुरीची पेरणी व लागवड झाली तुरीचे पीक सद्यःस्थितीत फुले व शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.