Rabi Sowing Sangli : सांगली जिल्ह्यात रब्बी पेरणी संथ गतीने, कृषी विभागाची आकडेवारी समोर

Sangli Crop : सांगली जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र १८ हजार हेक्टर असून, आतापर्यंत साडेसात हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी एक हजार हेक्टरवर, तर कडधान्य व तेलबियांचीही पेरणी जेमतेम २० टक्के आहे.
Rabi Sowing Sangli
Rabi Sowing Sangliagrowon
Published on
Updated on

Sangli District Agriculture : सांगली जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यांत सतत होत असलेल्या पावसाने यंदा रब्बी हंगामात अत्यंत सथ गतीने पेरण्या सुरू आहेत. ६ नोव्हेंबरअखेर कृषी विभागाकडे ४९ टक्के क्षेत्रावर पेरणीची नोंद असली तरी, ६० टक्क्यांहून अधिक क्षेत्रावर पेरणी झाली असण्याची शक्यात कृषी विभागाकडून व्यक्त करण्यात आली.

सांगली जिल्ह्याचे अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले की, यंदा दोन-तीन महिने पावसाचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे. येत्या आठवड्यात गतीने पेरणी होईल. यंदा सरासरीच्या १७० टक्क्यांहून अधिक पावसामुळे शेतीत वाफसा येण्यासाठी भरपूर कालावधी लागतो असे कुंभार यांनी सांगितलं.

गेली दोन-तीन महिने सलग पावसामुळे यंदा रब्बी हंगामातील पेरण्या संथ गतीने सुरू आहेत. जिल्ह्यात ६ नोव्हेंबर अखेर कृषी विभागाच्या अहवालानुसार ४८.५ टक्केच पेरणी झाली आहे. प्रत्यक्षात गेल्या सहा दिवसांत आणखी दहा- अकरा टक्क्यांनी पेरणी क्षेत्रात वाढ झाली असेल. पाऊस, घात नसल्याने गहू, हरभरा टोकणी सुरू झालेली नाही. जिल्ह्याचे रब्बीचे सरासरी क्षेत्र १ लाख ९१ हजार १६३ हेक्टर आहे.

यापैकी ९२ हजार ७९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सर्वाधिक क्षेत्र शाळू ज्वारीचे आहे. सरासरी क्षेत्र १ लाख २६ हजार हेक्टर होते. त्यातील ७८ हजार २५४ हेक्टरवर म्हणजे ६२ टक्के क्षेत्रावर पेरणी झाली आहे. जिल्ह्यात मका पिकाचे सरासरी क्षेत्र १८ हजार हेक्टर असून, आतापर्यंत साडेसात हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. हरभऱ्याची पेरणी एक हजार हेक्टरवर, तर कडधान्य व तेलबियांचीही पेरणी जेमतेम २० टक्के आहे.

Rabi Sowing Sangli
Sangli Congress : शेतकऱ्यांची नाही अदानी, अंबानींची कर्जमाफी करणार सरकार : खासदार इम्रान प्रतापगढी

धांदल सुरू...

यंदा अद्यापही हरभरा आणि गहू पेरणीसाठी पोषक परिस्थितीच निर्माण झालेली नाही. गहू टोकणी १५ नोव्हेंबरपूर्वी पूर्ण व्हावी लागते; मात्र यंदा वाफसा आणि खरिपातील पीक काढणीसाठी विलंब होत आहे. काही क्षेत्रावर अद्यापही मक्यासह अन्य काही पिके उभी आहेत. त्यामुळे गहू, हरभरा पिकांच्या लागवडीसाठी सध्या शेतकऱ्यांची धांदल सुरू झालेली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com