Ahilyanagar News : जिल्ह्यात आतापर्यंत रब्बी पेरणी क्षेत्र सरासरीच्या आतच आहे. आतापर्यंत रब्बीची ५ लाख ३ हजार ९६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदा ३२ हजार हेक्टरने रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. गहू, मका, हरभऱ्याची पेरणी अधिक असून ज्वारीने मात्र यंदाही सरासरी गाठली नाही.
अहिल्यानगर जिल्ह्यात रब्बीचे ४ लाख ५८ हजार १४९ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा पावसाची व पाण्याची स्थिती चांगली असल्याने रब्बी पेरण्याला वेग येईल असे वाटत होते. मात्र परतीचा पाऊस गेल्यानंतरही मध्यंतरी अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे पेरण्या रखडल्या होत्या. आतापर्यंत सर्वाधिक ज्वारीची पेरणी झाली आहे.
गेल्या दहा वर्षांचा विचार करता पन्नास टक्के ज्वारीचे क्षेत्र कमी झाले आहे. यंदा अजून ज्वारीचे क्षेत्र सरासरीच्या पेरणीपेक्षा कमी होते की काय अशी स्थिती आहे. हरभरा, मका, गव्हाच्या पेरण्या जोरात झाल्या आहेत.
आता या पेरण्याचाही कालावधी संपल्यासारखा आहे. मध्यंतरी कमी झालेली थंडी पुन्हा चार-पाच दिवसांपासून वाढली आहे. आतापर्यंत ज्वारीची सरासरीच्या ५२ टक्के, गव्हाची १६५ टक्के पेरणी झाली आहे.
मक्याच्या पेरणी अधिक झाली आहे. मक्याची आतापर्यंत २६७ टक्के पेरणी झाली आहे. हरभऱ्याची ११८ टक्के झाली आहे. करडई, जवस, तीळ, सूर्यफुलाचे पेरणी क्षेत्र अल्प आहे. रब्बीत होणारी ऊस लागवड यंदा आतापर्यंत ७१ टक्के म्हणजे ६७ हजार २५६ हेक्टरवर झाली आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात यंदा रब्बीची स्थिती चांगली आहे. मात्र आता बऱ्याच पिकांचा पेरणी कालावधी संपलेला असल्याने आता फारशी पेरणी क्षेत्र वाढेल अशी असे दिसत नाही. त्यामुळे यंदाही सरासरी एवढी पेरणी होईल की नाही यात शंका आहे. यंदा कांदा लागवडीला मात्र अधिक शेतकऱ्यांनी प्राधान्य दिलेले आहे.
पेरणीक्षेत्र कंसात सरासरी क्षेत्र (हेक्टर)
ज्वारी १ लाख ४९ हजार ५२७
(२ लाख ६७ हजार ८३४)
गहु १ लाख ४२ हजार ७८७
(८६ हजार ४०४)
मका ३७ हजार ७१२
(१४ हजार ११८)
हरभरा १ लाख ४ हजार ६३१
(८८ हजार ३७६)
करडई २७७ (३६०)
जवस २४ (१५)
तीळ २३ (२०.२)
सूर्यफूल ११२ (३१.४)
नवीन ऊस लागवड ६७ हजार २५६ (९४ हजार ६९३)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.