Rabi Sowing : मराठवाड्यातील तीन जिल्हे बनले रब्बी हंगामाचे केंद्रबिंदू

Rabi Season : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड येथील रब्बीच्या सर्वसाधारण ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९ लाख १२ हजार ६९३.५० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे.
Rabi Season
Rabi SowingAgriculture
Published on
Updated on

Chh. Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड येथील रब्बीच्या सर्वसाधारण ७ लाख ४१ हजार १८० हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत ९ लाख १२ हजार ६९३.५० हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. ही टक्केवारी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२३.१४ इतकी आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील क्षेत्र १ लाख ९० हजार ९३५ हेक्टर असून, या क्षेत्राच्या तुलनेत २ लाख ४५ हजार ७९२ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२८.७३ क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली. पेरणी झालेल्या क्षेत्रात गव्हाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सर्वसाधारण ६९ हजार ४०० हेक्टर क्षेत्राचे ९९ हजार ९१२ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली.

Rabi Season
Rabi Sowing : सातारा जिल्ह्यात रब्‍बीत शंभर टक्के पेरणी

गव्हाचे पीक सध्या फुटवा अवस्थेत असून, काही ठिकाणी ओंब्या लागण्याच्या अवस्थेत आहे. रब्बी ज्वारीची सर्वसाधारण क्षेत्र ४६ हजार ३७७ असताना प्रत्यक्षात ३१ हजार ८९५ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ६८.७३ टक्के इतकी आहे. ज्वारीचे पीक कणसे लग्नाच्या अवस्थेत, तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे.

हरभऱ्याचा सर्वसाधारण क्षेत्र ५२ हजार ८६६ हेक्टर असून, प्रत्यक्षात ६५ हजार ४४२ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२३.७९ टक्के क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली. हरभऱ्याचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत, तर काही ठिकाणी दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. काही ठिकाणी घाटे अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे.

जालना जिल्ह्याचे रब्बीचे सर्वसाधारण क्षेत्र २ लाख १७ हजार ८९२ हेक्टर असून, त्या तुलनेत प्रत्यक्षात २ लाख ६५ हजार २३६ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली आहे. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १२१.७३ टक्के इतकी आहे. जिल्ह्यात पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पेरणी हरभऱ्याची झाली आहे. जिल्ह्यात हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ६७ हजार ६५५ हेक्टर असताना प्रत्यक्षात ९३ हजार ७५२ हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली.

Rabi Season
Rabi Sowing : आठ तालुक्यात रब्बीचा सरासरीहून अधिक पेरा

हरभऱ्याचे पीक सध्या फुलोरा अवस्थेत आहे. जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र ८६ हजार ९३८ हेक्टर असताना प्रत्यक्षात ८४ हजार ८९० हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. ज्वारीचे पीक सध्या कणसे लागण्याच्या तर काही ठिकाणी पोटरी अवस्थेत आहे. जिल्ह्यात गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ४८ हजार २०९ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५९ हजार ४९९ हेक्टरवर गव्हाची पेरणी झाली. गव्हाचे पीक सध्या कांडी धरण्याच्या अवस्थेत आहे.

मकाचे सर्व साधारण क्षेत्र १३ हजार ९६६ हेक्टर असताना प्रत्यक्षात २४ हजार ८०५ हेक्टरवर म्हणजे सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत १८६.९८ टक्के क्षेत्रावर मकाची पेरणी झाली. मकाचे पीक तुरा लागण्याच्या अवस्थेत आहे. बीड जिल्ह्याचे रब्बी पिकाखाली सरासरी क्षेत्र ३ लाख ३२ हजार ३५३ हेक्टर असून प्रत्यक्षात ३ लाख ७६ हजार २३५ हेक्टरवर रब्बीची पेरणी झाली. जी सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत ११३.२० टक्के आहे.

जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ६८ हजार ८२२ हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ६५ हजार ८५० हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी झाली. गव्हाचे सर्वसाधारण क्षेत्र ३९ हजार ५६६ हेक्टर असताना प्रत्यक्षात ५१ हजार २३५ हेक्टरवर, तर मक्याचे सर्वसाधारण क्षेत्र ५९९५ हेक्टर असताना प्रत्यक्ष ४१३३ हेक्टरवर मकाची पेरणी झाली.

हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख १६ हजार ३२० हेक्टर असताना प्रत्यक्षात १ लाख ६२ हजार १२० हेक्टरवर हरभऱ्याची पेरणी झाली. हरभऱ्याच्या पिकावर काही ठिकाणी पाने खाणाऱ्या अळीचा अल्प प्रादुर्भाव आढळून आला आहे. हरभऱ्याचे पीक वाढीच्या, तर काही ठिकाणी फुलोरा अवस्थेत आहे.

पीकनिहाय प्रत्यक्ष पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)

रब्बी ज्वारी २ लाख ८२ हजार ६३५

गहू २ लाख १० हजार ६४६

मका ७५ हजार ६२२

इतर तृणधान्य ३४१६

हरभरा ३ लाख २१ ३१४.५०

इतर कडधान्य १ लाख ७०३६.५०

करडई ६२२

जवस ११७

तीळ १४

सूर्यफूल २१०

इतर गळीतधान्य ०६०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com