Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Season 2024 : यंदा रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

Rabi Sowing : यंदा मराठवाड्यातील लातूर व छत्रपती संभाजीनगर या दोन्ही कृषी विभागांतर्गत येत असलेल्या आठही जिल्ह्यांत रब्बीचे क्षेत्र वाढीचा अंदाज आहे.

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : यंदा मराठवाड्यातील लातूर व छत्रपती संभाजीनगर या दोन्ही कृषी विभागांतर्गत येत असलेल्या आठही जिल्ह्यांत रब्बीचे क्षेत्र वाढीचा अंदाज आहे. त्यामुळे लातूर कृषी विभागात यंदा १७ लाख २२ हजार ५१ हेक्टरवर, तर छत्रपती संभाजीनगर कृषी विभागात ९ लाख ९३ हजार हेक्टरवर मिळून २७ लाख १५ हजार ५१ हेक्टरवर मराठवाड्यात रब्बीची पेरणी प्रस्तावित करण्यात आली आहे.

लातूर कृषी विभागात येत असलेल्या लातूर, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड या पाच जिल्ह्यांत रब्बीचे सरासरी क्षेत्र १३ लाख ६३ हजार ९३१ हेक्टर आहे गतवर्षीच्या रब्बी हंगामात लातूर कृषी विभागात १५ लाख ९२ हजार ५८६ हेक्‍टरवर रब्बीची पेरणी झाली होती. त्यामुळे यंदा पुन्हा एकदा रब्बीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन कृषी विभागाकडून १७ लाख २२ हजार ५१ हेक्टरवर रब्बीचे पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

त्यामध्ये रब्बी ज्वारी ४ लाख २९ हजार ३०४ हेक्टरवर, गहू १ लाख ४१ हजार ३७८ हेक्टरवर, मका १९ हजार १४२ हेक्टरवर, हरभरा १० लाख ८६ हजार ९०२ हेक्टरवर, करडई ४२ हजार ३०० हेक्टरवर, जवस ४३४ हेक्टरवर, तर २५९१ हेक्टरवर इतर पिकांची पेरणी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे.

छत्रपती संभाजीनगर कृषी विभागातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीन जिल्ह्यांत रब्बी ज्वारी ३ लाख १७ हजार हेक्टरवर, गहू २ लाख ७ हजार हेक्टरवर, हरभरा ३ लाख ८४ हजार हेक्टरवर, मका ७० हजार हेक्टरवर, २० हजार हेक्टरवर इतर पिके पेरणीसाठी प्रस्तावित करण्यात आली आहेत.

खरिपातील पिकाचे परतीच्या व मॉन्सूनोत्तर पावसाने मोठे नुकसान केले. त्यामुळे यंदाची पेरणीही लांबण्याची शक्यता नाकारता येत नाही. अजूनही अनेक ठिकाणी रब्बी पेरणीसाठीची वापस स्थिती नाही.

नुकत्याच पार पडलेल्या विभागीय संशोधन व सल्लागार समिती बैठकीत खरिपाची झालेली नुकसान पावसाचे लांबणे व पाण्याची उपलब्धता यामुळे रब्बीचे क्षेत्र वाढणार हे कृषी विभागाचे अधिकारी व कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांच्या संवादातूनही पुढे आले होते.

जिल्हानिहाय प्रस्तावित पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

लातूर ३ लाख ८८ हजार ५३७

धाराशिव ४ लाख १९ हजार ९००

नांदेड ४ लाख ३२ हजार

परभणी २ लाख ६९ हजार २०५

हिंगोली २ लाख १२ हजार ४०९

छत्रपती संभाजीनगर २ लाख ३६ हजार

जालना २ लाख ९१ हजार

बीड ४ लाख ६६ हजार

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT