Rabbi Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Sowing : रब्बीच्या पेरणी क्षेत्रात ४१ हजार हेक्टरने वाढ

गव्हाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७४५ हेक्टरने घट झाली आहे. मक्याचे क्षेत्रही कमी झाले आहे.

माणिक रासवे

Parbhani Rabi Sowing : कृषी आणि महसूल विभागाकडून यंदाच्या (२०२२-२३) रब्बी हंगामातील पेरणी क्षेत्र गुरुवारी (ता. ९) अंतिम करण्यात आले. त्यानुसार परभणी जिल्ह्यात यावर्षी २ लाख ९५ हजार ४६२ हेक्टरवर (१०९.११ टक्के) पेरणी झाली.

गतवर्षीच्या तुलनेत यंदा रब्बीच्या क्षेत्रात ४० हजार ९९५ हेक्टरने वाढ झाली आहे. या ही वर्षी शेतकऱ्यांनी हरभऱ्याला (Chana Sowing) सर्वाधिक पसंती दिली असून यंदाच्या एकूण रब्बी क्षेत्रामध्ये एकट्या हरभऱ्याचे क्षेत्र ५८.४८ टक्के आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजयकुमार लोखंडे यांनी दिली.

यंदा जिल्ह्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र २ लाख ७० हजार ७९४ हेक्टर होते. गतवर्षीप्रमाणेच यंदाही विहिरी, विंधन विहिरी, लघु, मध्यम, मोठे प्रकल्प आदी सिंचन स्त्रोतांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध राहिले.

त्यामुळे जिल्ह्यातील रब्बीच्या क्षेत्राने यंदा सलग तिसऱ्या वर्षी सरासरी क्षेत्राचा टप्पा पार केला आहे. गतवर्षीच्या यंदा तुलनेत हरभऱ्याच्या क्षेत्रात ३६ हजार ७३४ हेक्टरने, ज्वारीच्या क्षेत्रात ४ हजार ४८१ हेक्टरने, करडईच्या क्षेत्रात ५२७ हेक्टरने वाढ झाली.

गव्हाच्या क्षेत्रात गतवर्षीच्या तुलनेत यंदा ७४५ हेक्टरने घट झाली आहे. मक्याचे क्षेत्रही कमी झाले आहे. जवस, सूर्यफूल या गळितधान्यांच्या क्षेत्रातील घट कायम आहे.

यंदा तृणधान्यांची १ लाख ५४ हजार ८७६ पैकी १ लाख २० हजार ६६८ हेक्टर (७७.९१ टक्के), कडधान्यांची १ लाख २२ हजार २७२ पैकी १ लाख ७३ हजार १०० हेक्टर (१५४.१८ टक्के), गळीत धान्यांची ३ हजार ६४४ पैकी १ हजार ६९३ हेक्टर (४६.४७ टक्के) पेरणी झाली आहे.

यंदा परभणी, सेलू या दोन तालुक्यात सरासरीपेक्षा कमी तर जिंतूर, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, पालम, पूर्णा या सात तालुक्यांत सरासरीपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे.

पीकनिहाय रब्बी अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

पीक - सर्वसाधारण -पेरणी क्षेत्र - टक्केवारी

ज्वारी - ११३०८९ - ८५७२२ - ७५.८०

गहू - ३९३०८ - ३३१२६ - ८४.२७

हरभरा - ११२१७० - १७२७९३ - १५४.०४

करडई - ३३७१ - १५०६ - ४४.५९

जवस - ११९ - ३६.२० - ३०.४२

सूर्यफूल - २६.२० - ९.०० - ३४.३५

मका - २०८६ - १३३९ - ६४.१७

तालुकानिहाय अंतिम पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका - सर्वसाधारण - पेरणी - टक्केवारी

परभणी - ५७९०० - ५६६४०- ९७.८२

जिंतूर - ५३७३०- ६०००१ - १११.६७

सेलू - ३३५६१- ३३३०८ - ९९.२५

मानवत - १६११९ - २००६९ - १२४.५१

पाथरी - १७०७२ - १८२४८ - १०६.८८

सोनपेठ- १५६९८ - १५८६४ - १०१.०६

गंगाखेड - ३२०८६ - ३२६५८ - १०१.७८

पालम- २०१३० - २१३७६ - १०६.१९

पूर्णा - २४४९५ - ३७२९७ - १५२.२६

तुलनात्मक रब्बी पेरणी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

वर्षे - सरासरी क्षेत्र - पेरणी क्षेत्र - टक्केवारी

२०२०-२१ - २१५९६१ २५९९०० १२०.३९

२०२१-२२ २१५९६१ २५४४६७ ११७.८२

२०२२-२३ २७०७९४ २९५४६२ १०९.११

सिंचनासाठी पाणी आहे. यंदा बहुतांश शेतकऱ्यांनी दरवर्षीप्रमाणे सोयाबीन नंतर तर काही शेतकऱ्यांनी कपाशीनंतर हरभऱ्याची पेरणी केली. परिणामी हरभऱ्याच्या क्षेत्रात गतवर्षीपेक्षा वाढ झाली. राजम्याचे प्रायोगिक क्षेत्र आहे.
विजयकुमार लोखंडे, जिल्हा अधीक्षक, कृषी अधिकारी, परभणी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture MSP : ‘एमएसपी’ला हवी कायदेशीर मान्यता

Turmeric Market : हिंगोलीत हळदीला मिळतोय ११५५० ते १४१०० रुपयांचा दर

Sugarcane Season 2024 : मराठवाड्यात पाच जिल्ह्यांतील १८ पैकी ९ कारखाने सुरू

Cold Weather Update : राज्यात गारठा वाढला

Kolhapur Politics : जिल्हा बँक, सहकारी साखर कारखाने कोल्हापूर जिल्ह्याचे सत्ता केंद्र; ६ आमदार साखर कारखानदार

SCROLL FOR NEXT