Chana Sowing : सोलापूरमध्ये हरभरा क्षेत्रात मोठी वाढ

पुणे विभागात यंदा दोन लाख ३६ हजार हेक्टरवर पेरणी
Chana Sowing
Chana SowingAgrowon

पुणे ः उशिराने थंडीत वाढ झाल्यानंतर रब्बी हंगामातील हरभरा पिकासाठी (Chana Crop) पोषक वातावरण तयार झाल्याने पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

पुणे विभागात सरासरी क्षेत्र एक लाख ८२ हजार ११९ हेक्टर असताना यंदा त्यात वाढ होऊन दोन लाख ३६ हजार ४८७ हेक्टर म्हणजेच १३० टक्के क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी झाली आहे.

विभागात नगर, सोलापूर जिल्ह्यांत हरभरा पिकाच्या क्षेत्रात चांगलीच वाढ झाली असून पेरण्या झालेल्या ठिकाणी पिके घाटे भरण्याच्या अवस्थेत आहे.

विभागात सरासरीच्या तुलनेत ५४ हजार ३६८ हेक्टरने पेरणीच्या क्षेत्रात वाढ झाली असल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Chana Sowing
Chana Sowing : हरभरा पेरा सरासरीजवळ

हरभऱ्याला चांगले दर (Chana Rate)मिळत असल्याने मागील काही वर्षांपासून हरभरा पिकाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.

विभागात हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे. त्यातच हरभरा पिकासाठी पोषक हवामान तयार झाल्याने शेतकऱ्यांनी ज्वारी, गहूबरोबरच हरभरा पिकाची पेरणी केली आहे.

यामध्ये शेतकऱ्यांनी हरभरा पिकांमध्ये कृषी विद्यापीठाकडील विजय, विशाल यांसारख्या विविध वाणांच्या हरभऱ्यांची पेरणी केली आहे.

Chana Sowing
Chana Sowing : राज्यात यंदा हरभरा क्षेत्रात यंदा मोठी वाढ

पाण्याची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकांची पेरणी केली. परंतु ज्या ठिकाणी ओल कमी आहे, अशा ठिकाणी कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत.

विभागात सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून सरासरीच्या १६ हजार ९५० हेक्टरपैकी २६ हजार ३०० हेक्टर म्हणजेच १५५ टक्के पेरणी झाली आहे.

तर दक्षिण सोलापूर, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर, माढा, मंगळवेढा या तालुक्यांत चांगली पेरणी झाली आहे.

तर, पंढरपूर, माळशिरस, मोहोळ, सांगोला या तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातील नगर तालुक्यात १० हजार ४९ हेक्टरपैकी सुमारे १२ हजार ६८८ हेक्टर म्हणजेच १२६ टक्के पेरणी झाली आहे. तर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, पाथर्डी,  राहुरी, अकोले, श्रीरामपूर या तालुक्यांत १०० टक्क्यांहून अधिक, तर कर्जत, शेवगाव, नेवासा,   संगमनेर, कोपरगाव, राहाता या तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा कमी पेरणी झाली आहे.

पुणे जिल्ह्यात बारामती तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली असून सरासरीच्या ६ हजार ३७३ हेक्टरपैकी ५ हजार २९१ हेक्टर म्हणजेच ८३ टक्के पेरणी झाली आहे.

तर, उर्वरित तालुक्यात कमी-अधिक प्रमाणात पेरणी झाली आहे. ज्या ठिकाणी पेरणी झाली आहे, तेथे हरभरा पिके वाढीच्या व घाटे येण्याच्या अवस्थेत आहे.

जिल्हानिहाय झालेली हरभरा
पिकांची पेरणी (हेक्टरमध्ये)
जिल्हा सरासरी क्षेत्र झालेली पेरणी टक्के
नगर ८८,३७७ १,१८,२१३ १३४
पुणे ३४,३३० २५,५८५ ७५
सोलापूर ५९,४१२ ९२,६८९ १५६
एकूण १,८२,११९ २,३६,४८७ १३०

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com