Rabi Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Rabi Crop : पाण्याअभावी रब्बी हंगाम धोक्यात

Rabi Season Update : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात पाण्याअभावी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे.

Team Agrowon

Ambejogai News : अंबाजोगाई तालुक्यातील धानोरा खुर्द परिसरात पाण्याअभावी रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. गतवर्षी जूनपासून पाऊस कमी झाल्याने खरिपातील सोयाबीनसह इतर पिके शेतकऱ्यांच्या हातून गेले होते. जमिनीमध्ये पुरेशी ओल नसल्यामुळे रब्बी हंगामातील पिकेही आता धोक्यात आली आहेत.

गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. खरिपातील सोयाबीन, तूर, मूग, कापूस या पिकांचे कमी पावसामुळे मोठे नुकसान झाले होते. परतीच्या जेमतेम पावसावर रब्बी हंगामाची पेरणी केली होती. पाऊस कमी झाल्याने विहीरी, बोअरची पाणी पातळी खालावली आहे.

जमिनीमध्ये ओलावा नसल्याने हरभरा, गहू, ज्वारी, राजमा ही पिके वाळत असून, वाढ खुंटलेली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे विहीर, बोअरचे पाणी होते, अशांचेही पाणी आता कमी पडले आहे. यामुळे पिकांना फटका बसत आहे. हाता तोंडाशी आलेले पीक हातातून जात असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे.

२५ टक्के अग्रिम रक्कमेपासून वंचित

अंबाजोगाई तालुक्यात दुष्काळ जाहीर झाला असला तरी शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित आहेत.काही शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम विमा रक्कम मिळाली असली तरी बहुभूधारक शेतकरी अजूनही २५ टक्के अग्रिम विमा रक्कमेपासून वंचित आहेत.

अंबाजोगाई तालुक्यात ७५ टक्के शेतकऱ्यांना २५ टक्के विमा अग्रिम रक्कम मिळाली आहे. दोन हेक्टर पुढील जमीन क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांचे व्हेरिफिकेशन सुरू असून, त्यांच्या खात्यावर ३० जानेवारीपर्यंत २५ टक्के अग्रीम विमा रक्कम जमा होणार आहे.
एन. एम. पोटभरे, विमा कंपनी तालुका प्रतिनिधी, अंबाजोगाई

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफीची रक्कम येत्या दोन दिवसांत; सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Political Debate: घाबरलेल्या मोदी-शहांकडून संसदेचा अपमान : खर्गे

Kharif Sowing Deficit: देशभरात खरीप पेरणीतील तूट तीन टक्क्यांखाली

Onion Procurement Controversy: परराज्यांतील निकृष्ट कांद्यामुळे खळबळ

Rain Alert: कोकण, घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता

SCROLL FOR NEXT