Rabi Season : खानदेशात सततच्या ढगाळ हवामानाचा रब्बी पिकांना फटका

Rabi Crop : यंदा नैसर्गिक समस्या शेतीसमोर अधिक असून, पाऊसही कमी पडला. आता हिवाळ्यातही थंडीचा कडाका जाणवला नाही. याचा फटका रब्बीला बसेल, अशी भिती आहे. थंडी कमी असल्याने गहू, दादर, ज्वारी या पिकांच्या उत्पादनही यंदा घट होणार आहे.
Weather
WeatherAgrowon

Jalgaon News : यंदा नैसर्गिक समस्या शेतीसमोर अधिक असून, पाऊसही कमी पडला. आता हिवाळ्यातही थंडीचा कडाका जाणवला नाही. याचा फटका रब्बीला बसेल, अशी भिती आहे. थंडी कमी असल्याने गहू, दादर, ज्वारी या पिकांच्या उत्पादनही यंदा घट होणार आहे.

यंदा हिवाळ्यात फक्त चार - पाच दिवस जळगाव जिल्ह्याचे तापमान १० अंशाखाली गेले असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. २०२३ च्या एप्रिलमध्ये बमोसमी पाऊस पडला होता. मे महिना कडाक्याचा होता. तर पाऊस लांबण्याच्या शक्यतेने ऑगस्टपर्यंत पाणी टंचाई जाणवेल असा अंदाज वर्तवीत जिल्हा प्रशासनाने पाणी टंचाई आराखड्यासाठी अतिरिक्त दोन कोटींची तरतूद केली आहे.

Weather
Rabi Season : बदलते वातावरण; रब्बीला फटका

त्यात पावसाळा जूनच्या शेवटी सूरू झाला. जुलैत चांगला पाऊस बरसला मात्र पुन्हा ऑगस्ट मध्ये महिनाभराची ओढ पावसाने दिली. ऑगस्टच्या शेवटी सप्टेंबरमध्ये बऱ्यापैकी पाऊस झाला. यामुळे खरिपाच्या पिके साठ टक्के वाचली होती. परतीचा मॉन्सून केव्हा गायब झाला याचा अंदाजही आला नाही. पावसाच्या लहरीपणामुळे खरिपात उडीद, मुगाबरोबरच कापसाचे नुकसान झाले. कोरडवाहू कपाशीचे उत्पादन अतिशय कमी आले.

परतीचा पाऊस आला नाही. थंडीचा कडाका दीड-दोन महिने राहिला तर रब्बीतील गहू, हरभरा, ज्वारी, दादर ही पिके यावर येत होती. यंदा मात्र नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी या तीन महिन्यांत केवळ तीन चार दिवस तापमान १० अंशावर खाली होते. काही दिवस हुडहुडी होती. नंतर उष्णता अशी स्थिती अनेक दिवस होती.

Weather
Rabi Season : रब्बीतील १ लाख ३० हजार हेक्टरवर ई-पीकपाहणी

नोव्हेंबरमध्ये बेमोसमी पाऊस झाला. अशात हुडहुडी भरविणारी थंडी नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थंडी जाणवली नाही. ढगाळ वातावरण अनेक दिवस राहील्याने थंडीचा कडाका बेपत्ता झाला. परिणामी आता फेब्रुवारीपासूनच उन्हाची तीव्रता वाढेल की काय अशी भिती शेतकऱ्यांना आहे.

दरवर्षी थंडीचा कडाका असतो. यंदा मात्र तसा कडाका अतिशय कमी दिवस जाणवला. थंडीवरच गहू, ज्वारी ही पिके येतात. त्यांना पाण्याची गरज नसते. गहु, ज्वारीच्या उत्पादनात यंदा घट येण्याची चिन्हे आहे. गव्हाला, ज्वारीला थंडीचे गरज असते.
खेमचंद महाजन, असोदा (ता.जि.जळगाव)
थंडी अभावी गहू, ज्वारी, कांदा, हरभरा या पिकांना फटका बसला आहे. या पिकांचे उत्पादन कमी येईल. गव्हाला, हरभऱ्याला पोषक असे वातावरण हिवाळ्यात असते. थंडीचा कडाका वाढण्याची गरज आहे. आता तापमानात वाढ होत आहे.
विजय झोपे, तळवेल, ता.भुसावळ,जि.जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com