Rabi Season  Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Sowing : रब्बीत शेतकऱ्यांचा कमी पाण्यावरील पिकांवर भर ; ज्वारीच्या पेरण्यांची लगबग सुरू

Rabi Season : खरिपात कमी पर्जन्यमानामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कमी पाण्यावरील रब्बी ज्वारी, हरभरा अशा पिकांवर भर देण्याची शक्यता आहे.

Swapnil Shinde

Pune News : खरिपात कमी पर्जन्यमानामुळे रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा कमी पाण्यावरील रब्बी ज्वारी, हरभरा अशा पिकांवर भर देण्याची शक्यता आहे. सध्या वाढत असलेली ऑक्टोबर हिट, विहिरीत कमी असलेला पाणीसाठा आणि जमिनीत पुरेशी ओल नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचा ज्वारीकडे कल आहे. ज्वारीच्या क्षेत्रात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने अनेक शेतकऱ्यांनी रब्बीचे नियोजन करण्यास सुरुवात केली आहे.

पुणे जिल्ह्यात रब्बीचे एकूण २ लाख २९ हजार ७१२ हेक्टर क्षेत्र आहे. चालू वर्षी खरिपात झालेल्या कमी पावसामुळे रब्बीच्या पेरणी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने जवळपास दोन लाख ४९ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा दावा कृषी विभागाने केला आहे. यात ज्वारीची सुमारे एक लाख ३० हजार हेक्टरवर पेरणीची शक्यता आहे.

मॉन्सून हंगामात सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणे जिल्ह्याला चांगला आधार मिळाला आहे. तीन तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली. इतर तालुक्यांत शंभर टक्केपेक्षा कमी पाऊस झाला आहे. जिल्ह्यात हंगामात सरासरीच्या ८६१.६ मिलिमीटरपैकी ६५६.९ मिलिमीटर म्हणजेच ७६.२ टक्के पाऊस पडल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. गेल्या दहा ते बारा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. यामुळे जिल्ह्यात रब्बीच्या शेतीकामांना वेग आला आहे. काही ठिकाणी ज्वारीच्या पेरण्याची लगबग सुरू झाली असली तरी लवकरच शेतकरी रब्बी हंगामातील गहू, हरभरा, करडई, तीळ, जवस, सूर्यफूल या पिकांच्या पेरण्यांना सुरुवात करतील.

खरिपात शेतकऱ्यांनी दोन हजार ९३३ कोटी ६८ लाख रुपयांचे पीककर्ज घेऊन खरिपाचे नियोजन केले होते. परंतु पुरेसा पाऊस न पडल्याने अक्षरशः हा हंगाम वाया गेल्यात जमा आहे. पुरंदर तालुक्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने ऐन पावसाळ्यात ११ टॅंकर सुरू आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम अडचणीचा जाण्याची शक्यता शेतकऱ्यांना आहे. रब्बी ज्वारीपाठोपाठ गव्हाचे ४५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. हरभऱ्यांचे ३५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यासाठी बियाणाची मागणी मोठी आहे. शेतकऱ्यांना तालुका, गाव पातळीवरील कृषी सेवा केंद्रामार्फत निविष्ठांचा पुरवठा केला जाणार आहे.कृषी विभागाने रब्बी हंगामासाठी एक लाख ८१ हजार टन खतांची मागणी केली आहे.

तीस हजार क्विंटल बियाणांची मागणी

रब्बीत शेतकऱ्यांची गरज लक्षात घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांच्या स्तरावरून करण्यात आलेल्या मागणीनुसार विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयामार्फत कृषी आयुक्त कार्यालयाकडे ३० हजार ३६२ क्विटंल बियाण्यांची मागणी केली आहे. यात ‘महाबीज’कडून ११ हजार ५०० क्विंटल, खासगी कंपन्यांकडून १८ हजार ८६२ क्विंटल बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे. कृषी आयुक्तालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर बियाणांचे वाटप सुरू करण्यात येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT