Manvat News : मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने यावर्षी तालुक्यात पंचवीस हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आली आहे. यात हरभरा क्षेत्र सरासरीपेक्षा दुपटीने वाढले आहे. सध्या सर्व पिके उत्तम अवस्थेत असून समाधानकारक उत्पन्न होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात यावर्षी २५ हजार ३३८ हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी करण्यात आलेली आहे. तालुक्यात सरासरी रब्बीचे पेरणी क्षेत्र १७ हजार ८५१ हेक्टर आहे. यावर्षी पावसाने सरासरी ओलांडली. यामुळे पाणी पातळी वाढली.
शिवाय जायकवाडीच्या डाव्या कालवा क्षेत्रात पाणी उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांनी रब्बीचे क्षेत्र वाढविले. तालुक्यात सरासरी पाच हजार ७९३ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी केली जाते. यंदा हे क्षेत्र दुपटीपेक्षा जास्त वाढले आहे.
तब्बल १२ हजार ४३७ हेक्टरवर हरभरा पेरणी करण्यात आली आहे. ८ हजार ५०५ हेक्टरवर रब्बी ज्वारीची पेरणी करण्यात आली आहे. कमी बाजारभाव, मागणीचा उतरता आलेख व मजुरांची टंचाई या कारणामुळे शेतकऱ्यांनी ज्वारीकडे पाठ फिरवल्याचे चित्र दिसत आहे.
तालुक्यात ३ हजार २८४ हेक्टर क्षेत्रावर गव्हाची पेरणी करण्यात आलेली आहे. तर २२५ हेक्टरवर करडई व २२१ हेक्टरवर मका पेरणी करण्यात आली आहे. मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना यावर्षी रब्बीच्या हंगामावर चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे. वातावरण अनुकूल राहिल्यास समाधानकारक उत्पन्न होण्याची आशा आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.