Jowar Farming Agrowon
ॲग्रो विशेष

Jowar Harvesting: रब्बी हंगामातील ज्वारी काढणीस सुरुवात

Rabi Season: रब्बी हंगामातील ज्वारीची पिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत. सध्या थंडी कमी-अधिक होत असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून काढणीस चांगलाच वेग येईल, अशी शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी काढणीस सुरुवातही झाली आहे.

Team Agrowon

Pune News: रब्बी हंगामातील ज्वारीची पिके काढणीच्या अवस्थेत आली आहेत. सध्या थंडी कमी-अधिक होत असल्याने फेब्रुवारी महिन्यापासून काढणीस चांगलाच वेग येईल, अशी शक्यता आहे. तर अनेक ठिकाणी काढणीस सुरुवातही झाली आहे.

गेल्या महिन्यात व चालू महिन्यात अधूनमधून ढगाळ वातावरणामुळे थंडी कमी-अधिक होत असल्याने ज्वारीवर रोग, किडीचा प्रादुर्भाव झाला, मात्र शेतकऱ्यांनी वेळीच योग्य त्या उपाययोजना केल्याने फारसा प्रादुर्भाव झाला नाही. अनेक ठिकाणी पिके जोमदारपणे आली आहेत.

पुणे विभागात सरासरी सात लाख २० हजार २२७ हेक्टरपैकी २ लाख ४० हजार २३१ हेक्टर म्हणजेच ६८ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सध्या बागायत भागातील गहू, हरभरा पिके वाढीच्या अवस्थेत असून ज्वारीच्या पिके काढणीच्या अवस्थेत आहे.

पुणे जिल्ह्यातील पश्चिमेकडील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा तालुके ही खरिपाची पिके म्हणून ओळखली जातात. त्यामुळे रब्बी हंगामात या तालुक्यात अत्यंत कमी प्रमाणात पेरणी झाल्याचे दिसून येते.

पू्र्वेकडील शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खेड, आंबेगाव, जुन्नर तालुक्यांत रब्बीची मोठ्या प्रमाणात पेरणी झालेली आहे. त्यातच उशिराने साखर कारखाने सुरू झाल्याने ज्वारीऐवजी गहू आणि हरभरा पिकांना प्राधान्य दिल्याचे दिसून येते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Plastic Eating in Cows: जनावरांनी प्लास्टिक, खिळे खाल्ले तर काय होईल? जाणून घ्या आवश्यक उपाय

Rural Governance: मुदत संपणाऱ्या ६५८ ग्रामपंचायतींवर आता प्रशासक

Tur Prices: सोलापूर जिल्ह्यात तूर अन्‌ सोयाबीनचे दर हमीभावाच्या वर!

Namo Installment : अडीच महिने उलटूनही नमोचा हप्ता मिळेना

Maharashtra Government: ७ फेब्रुवारीला उद्योग, कारखान्यांतील कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी जाहीर

SCROLL FOR NEXT