Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Quality Control Department: गुणनियंत्रण विभागाची होणार पुनर्रचना

Restructuring Agriculture Department : खते, बियाणांचे प्रमाणीकरण, परवाने वितरण आणि बनावट आणि बोगस निविष्ठांवरील कारवाईचे अधिकार असलेल्या ‘कृषी’च्या गुणनियंत्रण विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे.

बाळासाहेब पाटील

Mumbai News: खते, बियाणांचे प्रमाणीकरण, परवाने वितरण आणि बनावट आणि बोगस निविष्ठांवरील कारवाईचे अधिकार असलेल्या ‘कृषी’च्या गुणनियंत्रण विभागाची पुनर्रचना करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या अर्धवेळ निरिक्षकांऐवजी पूर्णवेळ निरीक्षक नेमले जाणार आहेत. त्यामुळे अर्धवेळ निरीक्षकांची संख्या १०६८ वरून ८७, तर पूर्ण वेळ निरीक्षकांची संख्या ६३ वरून ४०४ करण्यात येणार आहे.

मुळात जबाबदारी निश्चित करण्यात येणार असून कारवाईच्या नावाखाली एकाच दुकानात अनेक निरीक्षकांचे जाणे बंद करण्यासाठी कृषी विभागात या बदलाची कार्यवाही सुरू आहे. नव्या रचनेमध्ये तालुका कृषी अधिकाऱ्याला पूर्णवेळ निरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात येणार आहे. तसेच काही तालुक्यांमध्ये कृषी अधिकारी आणि जिल्हा परिषदांनाही अधिकार देण्याचे प्रस्तावित आहे.

बियाणे खते व कीटकनाशके कायद्यानुसार नियुक्त केलेले निरीक्षक हे अर्धवेळ असून त्यांच्या जागी पूर्णवेळ निरीक्षक नेमण्याची कार्यवाही सुरू आहे. सध्या तालुक्यासाठी पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी हे अर्धवेळ निरीक्षक आहेत. तसेच उपविभागीय कृषी अधिकारी व त्याच कार्यालयातील तंत्र अधिकारी हेही तालुक्यासाठी अर्धवेळ निरीक्षक आहेत. त्यामुळे तालुका कार्यक्षेत्रासाठी चार निरीक्षक असूनही एकही पूर्णवेळ निरीक्षक नसल्याने कार्यवाहीसाठी नेमकी कुणावर जबाबदारी आहे, याबाबत संभ्रम होता.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांना पूर्णवेळ निरीक्षक म्हणून नियुक्त करावे, असे आकृतिबंधात नमूदही आहे. मात्र, आकृतिबंध अंतिम न झाल्याने तोवर तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडील कामकाज स्थानिक मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात येणार आहे. तसेच काही तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या कृषी अधिकाऱ्यांनाही अधिकार देणे प्रस्तावित आहे. यानुसार १२५ तालुक्यांना २ निरीक्षक प्रस्तावित होतील.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना अधिकार

सध्या जिल्हास्तरावर तीन निरीक्षक असून त्यांच्यात समन्वय नाही. त्यामुळे जिल्हा स्तरावर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना संपूर्ण जिल्ह्याचे अधिकार देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी, मोहीम अधिकारी आणि जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील निरीक्षकपदाचा पदभार देण्यात येणार आहे. विभाग स्तरावर असलेल्या विभागीय कृषी सहसंचालक, गुणनियंत्रणचे तंत्र अधिकारी, कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालकांनाही त्यांच्या कार्यकक्षेनुसार निरीक्षक म्हणून अधिकार देण्यात येणार आहेत.

पूर्णवेळ निरीक्षकांची संख्या वाढेल

निरीक्षकांची संख्या व अधिकारामध्ये बदल केल्यास त्यांची संख्या ११३१ वरून ६५० एवढी होणार आहे. तसेच पूर्णवेळी निरीक्षकांची संख्या ६३ वरून ४०४ होईल. हे निरीक्षक कृषी निविष्ठा नियमांबरोबरच गुणनियंत्रणाचे देखील काम करणार आहेत. सध्या १०६८ अर्धवेळ व ६३ पूर्णवेळ असे ११३१ निरीक्षक आहेत. यामध्ये अर्धवेळ निरीक्षकांची संख्या १०६८ यरून ८७ आणि पूर्णवेळ निरीक्षकांची संख्या ६३ वरून ४०४ होणार आहे.

अशी असेल रचना

तंत्र अधिकारी : ८

विभागीय गुणनियंत्रण : ८

जिल्हा गुणवत्ता गुणनियंत्रण : ३४

तालुका गुणनियंत्रण : ३५४

एकूण निरीक्षक : ४०४

विभाग स्तरावर १ पूर्णवेळ निरीक्षक आणि विभागीय कृषी सहसंचालक (अर्धवेळ)

२ विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय : पूर्णवेळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT