Cotton Procurement Agrowon
ॲग्रो विशेष

Cotton Procurement : परभणी, हिंगोलीत १५ लाख १८ हजार क्विंटल कापूस खरेदी

Cotton Producers Marketing Federation : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गंत परभणी व हिंगोली जिल्ह्यात खासगी कापूस खरेदी सुरु आहे.

Team Agrowon

Parbhani News : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गंत परभणी व हिंगोली जिल्ह्यात खासगी कापूस खरेदी सुरु आहे. गुरुवार (ता. २०) अखेरपर्यंत या दोन जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये खासगी व्यापाऱ्याकडून १४ लाख ५० हजार २३४ क्विंटल कापूस खरेदी झाली तर भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल व कापूस खरेदी झालेली आहे. या दोन जिल्ह्यात सीसीआय आणि खासगी मिळून एकूण १५ लाख १८ हजार ३५२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

परभणी जिल्ह्यांमधील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलाद्वावारे खासगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी केली जात आहे. २०२३-२४ च्या खरेदी हंगामात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समित्यांअंतर्गंत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये १३ लाख ७३ हजार ७५४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्यांतर्गंतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ७६ हजार ४८० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यात खासगी व्यापाऱ्यांकडून एकूण १४ लाख ५० हजार क्विंटल कापूस खरेदी करण्यात आली आहे. मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल ७३५० ते ७६५० रुपये दर मिळाले

६८ हजार क्विंटल कापूस खरेदी...

भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ६३ हजार १३३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे १ हजार २८३ क्विंटल शिरडशहापूर येथील केंद्रावर ३ हजार ७०२ क्विंटल मिळून एकूण ४ हजार ९८५ क्विंटल कापूस खरेदी झाली. या दोन जिल्ह्यातील ७ केंद्रावर ६८ हजार क्विंटल कापूस खरेदी झालेली आहे.

खासगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी

परभणी ७ ३२९२५७

जिंतूर ४ १५०५४

बोरी १ ६१४८४

सेलू ६ ३६७६८१

मानवत १३ ४६५२५३

पाथरी २ २७१०८

सोनपेठ १ ३५३९९

गंगाखेड ३ २३०५४

ताडकळस २ ४९४६४

हिंगोली ३ ६९६१७

आखाडा बाळापूर १ ६८६३

सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण जिनिंग संख्या कापूस खरेदी

जिंतूर १ १३५६९

बोरी १ ११८७७

सेलू १ १६७८०

मानवत १ २०१९३

ताडकळस १ ७१४

हिंगोली १ १२८३

शिरडशहापूर १ ३७०२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

National Livestock Mission : घोडे कुठे पेंड खाते?

Agristack Yojana : ‘महसूल’कडून एक लाख खातेदारांना अप्रूव्हल नाही

Papaya Farming : खानदेशात पावसानंतर पपई पीक जोमात

Bhama Askhed Dam : भामा आसखेड धरणात ५४.२५ टक्के पाणीसाठा

Illegal Excavation : बेकायदा मुरूम उपशावर कारवाई

SCROLL FOR NEXT