Cotton Market : परभणी, हिंगोलीत १४ लाख क्विंटलवर कापूस खरेदी

Cotton Buying : खाजगी व्यापाऱ्यांकडून एकूण १३ लाख ७२ हजार ३०४ क्विंटल आणि भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.
Cotton Market
Cotton MarketAgrowon

Parbhani News : राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या परभणी झोन अंतर्गंत परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांअंतर्गंत ४३ जिनिंग कारखान्यांमध्ये शुक्रवार (ता. १७) खाजगी व्यापाऱ्यांकडून एकूण १३ लाख ७२ हजार ३०४ क्विंटल आणि भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) ७ केंद्रांवर ६८ हजार ११८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.या दोन जिल्ह्यात खाजगी व सीसीआय मिळून एकूण १४ लाख ४० हजार ४२२ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

यंदा आजवर परभणी व हिंगोली जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांतील कापसाचे कमाल दर साडेआठ हजाराच्या आत राहिले. नोव्हेंबर मधील मान्सून्नोत्तर पावसात भिजल्याने किमान दरात पाच हजार रुपयापर्यंत घसरण झाली. तेजीच्या अपेक्षेने अनेक भागातील शेतकऱ्यांनी कापूस साठवून ठेवला होता. परंतु दरात अपेक्षित सुधारणा न झाल्यामुळे शेतकऱ्यांचा अपेक्षा भंग झाला आहे.

Cotton Market
Cotton Cultivation : पूर्वहंगामी कापूस लागवडीची तयारी वेगात

या दोन जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये जाहीर लिलावाद्वारे खाजगी व्यापाऱ्याकडून कापूस खरेदी केली जात आहे.त्यात परभणी जिल्ह्यातील परभणी, जिंतूर, बोरी, सेलू, मानवत, पाथरी, सोनपेठ, गंगाखेड, ताडकळस या ९ बाजार समित्यांअंतर्गंत ३९ जिनिंग कारखान्यांमध्ये शुक्रवार (ता.१७) अखेर पर्यत १२ लाख ९९ हजार ३३४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे.

हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली व आखाडा बाळापूर बाजार समित्यांतर्गंतच्या ४ जिनिंग कारखान्यांमध्ये ७२ हजार ९७० क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. या दोन जिल्ह्यात खाजगी व्यापाऱ्यांकडून एकूण १३ लाख ७२ हजार ३०४ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. मागील आठवड्यात कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ७१५० ते ७४४५ रुपये दर मिळाले.

Cotton Market
Organic Cotton : सेंद्रिय कापसाला पूर्व विदर्भात प्रोत्साहन

भारतीय कापूस महामंडळाची (सीसीआयची) परभणी जिल्ह्यातील जिंतूर, बोरी, सेलू, मानवत,ताडकळस या ५ केंद्रांवर एकूण ६३ हजार १३३ क्विंटल व हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली येथे १ हजार २८३ क्विंटल शिरडशहापूर येथील केंद्रावर ३ हजार क्विंटल मिळून एकूण ४ हजार क्विंटल कापूस खरेदी झाली. सीसीआयीची या दोन जिल्ह्यातील ७ केंद्रावर ६८ हजार ११८ क्विंटल कापूस खरेदी झाली आहे. चांगल्या दर्जाच्या कापसाचे खुल्या बाजारीतील दर हमीभावापेक्षा जास्त आहेत.त्यामुळे सीसीआयची खरेदी केंद्रावरील कापूस खरेदी मागील काही आठवड्यापासून बंद आहे अशी माहिती पणन महासंघाच्या सूत्रांनी दिली.

खाजगी कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

बाजार समिती जिनिंग संख्या कापूस खरेदी

परभणी ७ २७६८०७

जिंतूर ४ १५२०६५

बोरी १ ५१४५५

सेलू ६ ३०८६९६

मानवत १३ ३८७९५८

पाथरी २ २३००६

सोनपेठ १ ३११५४

गंगाखेड ३ २०६८४

ताडकळस २ ४७५०९

हिंगोली ३ ६६२१२

आखाडा बाळापूर १ ६७५८

सीसीआय कापूस खरेदी स्थिती (क्विंटलमध्ये)

केंद्र ठिकाण जिनिंग संख्या कापूस खरेदी

जिंतूर १ १३५६९

बोरी १ ११८७७

सेलू १ १६७८०

मानवत १ २०१९३

ताडकळस १ ७१४

हिंगोली १ १२८३

शिरडशहापूर १ ३७०२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com