Cotton Procurement : ‘सीसीआय’ने खरेदी केला ३३ लाख गाठी कापूस

CCI Cotton Market : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (सीसीआय) सध्या कापसाचा चांगला स्टॉक आहे. सीसीआयने आतापर्यंत ३२.८५ लाख गाठींची खरेदी केली.
Cotton Procurement
Cotton ProcurementAgrowon

Pune News : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडे (सीसीआय) सध्या कापसाचा चांगला स्टॉक आहे. सीसीआयने आतापर्यंत ३२.८५ लाख गाठींची खरेदी केली. कापसाची गुणवत्ता चांगली असल्याने ‘सीसीआय’च्या कापसला बाजारभावापेक्षा चांगला भाव मिळत आहे. ‘सीसीआय’ कस्तुरी कॉटन भारत या ब्रॅंडखाली कापसाची विक्री करत आहे, अशी माहिती ‘सीसीआय’चे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.

सीसीआयचे गुप्ता यांनी सांगितले, की आतापर्यंत सीसीआयने जवळपास ३२.८५ लाख गाठी कापसाची खरेदी केली. त्यापैकी एकट्या तेलंगणातच २४ लाख गाठींची खरेदी करण्यात आली. त्यानंतर महाराष्ट्रात २.४४ लाख गाठी खरेदी झाली. तर आंध्र प्रदेशात १ लाख ३० हजार गाठी आणि मध्य प्रदेशात १ लाख २७ हजार गाठी कापूस सीसीआयने खेरदी केला. तर उतर्वरित खरेदी इतर राज्यांमध्ये झाली.

Cotton Procurement
Cotton Productivity : सिंचनाच्या अभावामुळे कापूस उत्पादकतेत पिछाडी

सीसीआयची कापूस खरेदी फेब्रुवारीपासून कमी झाल्याचे गुप्ता यांनी स्पष्ट केले. बाजारभाव हमीभावापेक्षा जास्त झाल्यानंतर शेतकऱ्यांनी सीसीआयला कापूस विक्री थांबवली. त्यामुळे सीसीआयला कापूस मिळत नाही. तरीही सीसीआयची केंद्रे सुरू आहेत. सीसीआयची शेवटची खरेदी ४ मार्च रोजी झाली होती. सध्या बाजारात सरासरी ७५०० के ७८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे. हा भाव हमीभावापेक्षा ७ ते ८ टक्के जास्त आहे.

Cotton Procurement
Cotton Crop : पोषक वातावरण नाही, तरीही कापूस पीक उत्तम

‘सीसीआय’चे अध्यक्ष म्हणाले..

- बाजारातील कापूस आवक ८० हजार ते १ लाख गाठींच्या दरम्यान

- देशात रोजचा वापर ८५ हजार गाठींच्या दरम्यान होतो

- सीसीआयने कस्तुरी कॉटन भारत या ब्रँडखाली कापसाची विक्री सुरू केली

- सीसीआयने चांगल्या गुणवत्तेचा कापूस खरेदी केला

- सीसीआयच्या कापूस गाठींची गुणवत्ता चांगली

- बाजारभावापेक्षा सीसीआयच्या कापूस गाठींना जास्त भाव

सीसीआयचा भाव महत्त्वाचा

अडचणीत आल्याचे कारण देत देशातील उद्योग सीसीआयकडे कमी भावात कापसाची मागणी करत असतात. मागे अनेकदा याचा अनुभव आला आहे. पण सीसीआय यंदा कमी भावात कापूस विक्री करण्याची शक्यता कमीच आहे. कारण सध्या सुतगिरण्या, कापड उद्योग, जिनिंग यांना फायदा होत आहे. विशेष म्हणजे सीसीआयच्या कापसाची गुणवत्ता चांगली आहे. सीसीआयच्या कापसाचेही भाव जास्त असल्याने बाजारभावाला आधार मिळेल, असे अभ्यासकांनी सांगितले.

खुल्या बाजारात कापसाचे भाव हमीभावापेक्षा जास्त झाल्याने सीसीआयला कापूस विक्री थांबली. सीसीआयने आतापर्यंत ५ लाख गाठी कापूस विकला. या कापसाला बाजारभावापेक्षा जास्त भाव मिळाला.
- ललितकुमार गुप्ता, अध्यक्ष, कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com