Fruit Orchard Agrowon
ॲग्रो विशेष

PDKV: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे फलोद्यानात ठोस पाऊल

Fruit Orchard Development: विदर्भात प्रामुख्याने शेती पारंपरिक पिकांवर अवलंबून आहे. त्यातच हवामान बदलाचे फटके दर हंगामात शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहेत. अशा स्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फलोद्यानावर भर वाढवत मागील दोन वर्षांत सुमारे ३०० एकरांपर्यंत विविध फळबागा उभ्या करण्याचे काम सुरू केले.

 गोपाल हागे

Akola News: विदर्भात प्रामुख्याने शेती पारंपरिक पिकांवर अवलंबून आहे. त्यातच हवामान बदलाचे फटके दर हंगामात शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहेत. अशा स्थितीत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने फलोद्यानावर भर वाढवत मागील दोन वर्षांत सुमारे ३०० एकरांपर्यंत विविध फळबागा उभ्या करण्याचे काम सुरू केले. लिंबूवर्गीय पिकांसह आंबा, चिकू, पेरू, सीताफळ अशा फळपिकांची लागवड वाढवली आहे.

डॉ. शरद गडाख यांनी विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर बरेच बदल दिसून येत आहेत. प्रामुख्याने वर्षानुवर्षे विद्यापीठाची पडीक दिसणारी जमीन आता उपजाऊ बनवली जात आहे. त्यावर विविध प्रकारच्या फळबागा डौलाने उभ्या राहत आहेत. या बागा आगामी काळात विद्यापीठाच्या उत्पन्नाचा स्रोत होणार आहेत, हे निश्‍चित मानले जाते.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात यापूर्वी पडीक जमिनीवरून नेहमीच प्रश्‍न उपस्थित केले जात होते. या जमिनींवर सर्वत्र गवत, झाडेझुडपे वाढलेली बघायला मिळत होती. मात्र, हे चित्र आता कालबाह्य होऊ लागले. पडीक जमिनींवर फळबाग लावण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षांत विद्यापीठाची सुमारे ३०० एकर जमीन फळबागांखाली आली आहे. यात संत्रा, लिंबू, मोसंबी, केसर आंबा, चिकू, पेरू, सीताफळाचा समावेश आहे. विद्यापीठाच्या काही प्रक्षेत्रावर चारोळी, बेलाची लागवड करण्यात आली आहे. या व्यावसायिक पिकांवर अभ्यास केला जाणार आहे.

केसर आंब्यावर होणार अभ्यास

मागील काही वर्षात केसर आंब्याचे क्षेत्र राज्यात आणि विदर्भातही विस्तारत आहे. या आंब्याच्या जातीवर अभ्यासासोबतच विद्यापीठाच्या महसुलातही वाढ करण्याच्या दृष्टीने ३३ एकरांत यंदा सुमारे साडेचार हजार केसर आंब्याची रोपे लावण्यात आली आहेत. यासाठी मध्यवर्ती संशोधन केंद्रातील उद्यानविद्या उपसंचालक डॉ. गोविंद जाधव यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरला.

कुलगुरू डॉ. शरद गडाख, संशोधन संचालक डॉ. विलास खर्चे, मध्यवर्ती संशोधन केंद्राच्या प्रमुख डॉ. वर्षा टापरे यांच्या मार्गदर्शनात ही लागवड करण्यात आली. २७ डिसेंबरला सुरू झालेले लागवडीचे काम गेले महिनाभर या ठिकाणी सुरू होते. काही महिन्यांपूर्वी गवताळ दिसणाऱ्या या क्षेत्रावर आता केसर आंब्याची बाग उभी राहत आहे. ही जमीन तयार करून त्याला कुंपण, रोपांना सिंचनासाठी ठिबक सुविधा देण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Farmers: मॉरिशसचे मृगजळ?

Banana Farming: खानदेशात दर्जेदार केळी आवकेत वाढ

Jaggery Export: युद्धामुळे गूळ निर्यात थांबली

Leopard Protection: बिबट्याला शेड्यूल-२ मध्ये टाकण्याचा निर्णय

Forest Food: कोल्हापुरात उद्यापासून कंदमुळांचे दोनदिवसीय प्रदर्शन

SCROLL FOR NEXT