PDKV Convocation Ceremony: डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा आज दीक्षान्त सोहळा

Dr. Panjabrao Deshmukh Graduation Event: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त सोहळा बुधवारी (ता. ५) होत असून, यंदा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे अध्यक्षस्थानी राहतील.
PDKV Press Conference
PDKV Press ConferenceAgrowon
Published on
Updated on

Akola News: डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा ३९ वा दीक्षान्त सोहळा बुधवारी (ता. ५) होत असून, यंदा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे अध्यक्षस्थानी राहतील. त्यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना पदवी, पदके देऊन सन्मानित करण्यात येईल, अशी माहिती कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी दिली.

दीक्षान्त सोहळ्याची माहिती देण्यासाठी मंगळवारी (ता. ४) पत्रकार परिषद घेतली. या वर्षी होत असलेल्या दीक्षान्त सोहळ्याला कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे, पालकमंत्री आकाश फुंडकर, कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल, कर्नाटक कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष डॉ. अशोक दलवाई (भाप्रसे निवृत्त) यांची प्रमुख उपस्थिती राहील. कुलगुरू डॉ. शरद गडाख हे स्वागतपर भाषण करतील.

PDKV Press Conference
PDKV Graduation Ceremony : पदवीदान कार्यक्रमात कृषी महाविद्यालयाचा डंका

पत्रकार परिषदेला विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. व्ही. के. खर्चे, शिक्षण विस्तार संचालक डॉ. डी. बी. उंदीरवाडे, अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने, डॉ. सुरेंद्र काळबांडे, डॉ. देवानंद पंचभाई, डॉ. शैलेश हरणे, डॉ. नितीन कोष्टी, डॉ. उमेश चिंचमलातपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांनी सूत्रसंचालन केले.

PDKV Press Conference
PDKV Akola : पंदेकृवि, सिंजेंटा फाउंडेशन, सिंजेंटा इंडिया लि. यांच्यात सामंजस्य करार

अम्रिथा प्रिया बी ठरली अव्वल

या वर्षी होत असलेल्या दीक्षान्त सोहळ्यात अम्रिथा प्रिया बी (एमएससी, कृषी महाविद्यालय, नागपूर) हिला ७ सुवर्ण, एक रौप्य अशी एकूण आठ पदके मिळाली आहेत. तिने सर्वाधिक पदके मिळवून बाजी मारली आहे.

या सोहळ्यात एकूण ३३६० पदव्यांचे वितरण केले जाईल. ३९ व्या दीक्षान्त सोहळ्यात एकूण ३३६० जणांना पदवी दिली जाईल. यात कृषी विद्याशाखा व कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या २८६० पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखेचे ४७५, आचार्य २५ अशा पदव्यांचे वितरण केले जाईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com