Punjab Agriculture Policy Update : पंजाब या कृषीप्रधान राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि शेतीला फायदेशीर व्यवसाय करण्यासाठी मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या सरकारने (Punjab government) प्रथमच कृषी धोरणा करत आहे.
यासाठी कृषीतज्ज्ञांसह शेतकऱ्यांकडून मागवल्या आहेत, असे कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री कुलदीप सिंग धालीवाल (Agriculture Minister Kuldeep Singh Dhaliwal) यांनी गुरुवारी सांगितले. ३० जून रोजी कृषी धोरण जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठ (PAU) मैदानावर ते दुसऱ्या सरकार किसान मेळावा (Sarkar Kisan Milni ) ला संबोधित करत होते. 12 फेब्रुवारी रोजी पहिली सरकार किसान मिलनी आयोजित करण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री भगवंत मान (CM Bhagwant Mann) यांची उपस्थिती होती.
कृषी मंत्री कुलदीप सिंग धालीवाल म्हणाले, आमच्याकडे पीएयूमध्ये कृषी क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट तज्ज्ञ आहेत. ते कृषी धोरण तयार करण्याचे काम करीत आहे. पण जे शेतकरी आहेत ते शेतात काम करतात. त्यामुळे त्याची माहिती आणि सूचना तज्ञांसाठी उपयुक्त ठरतील. मुख्यमंत्र्यांच्या पहिल्या मेळाव्यात शेतकऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान आम्हाला ६ हजारहून अधिक सूचना मिळाल्या. पण धोरण अंतिम करण्यापूर्वी आम्हाला आणखी सूचनांची गरज आहे आणि म्हणूनच आम्ही ही दुसरी मिलनी आयोजित केली आहे, धालीवाल पुढे म्हणाले.
ते पुढे म्हणाले, आतापर्यंत, पंजाबमध्ये कोणतेही कृषी धोरण नव्हते. त्यामुळे आम्हाला शेतीला फायदेशीर योजना बनवण्यात अडचणी येत होत्या, विशेषत: लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी. धोरण लागू झाल्यानंतर, आम्ही विविधतेचे नियोजन करू शकू आणि मंडईंमध्ये गहू आणि धान सोडून इतर पिके कशी विकायची हे ठरवू.
धालीवाल यांनी ऊस, कापूस, मधमाशी पालन, दुग्धव्यवसाय आदींच्या विविध स्टॉल्सना भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यूएसए, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, टांझानिया आणि झांबियातील सुमारे १५ एनआरआय शेतकऱ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावून आपले अनुभव सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.