Pomegranate Yard: न्यायप्रविष्ट जागेवर पुन्हा डाळिंब यार्डाचा घाट
Market Committee: काही वर्षांपूर्वी पणन संचालकांनी फेटाळलेल्या न्यायप्रविष्ट जागेवरील डाळिंब यार्डाचे प्रकरण पुन्हा एकदा शिजू लागले आहे. प्रत्येकी १५ लाख रुपयांच्या बदल्यात काही निवडक अडत्यांना कोट्यवधी रुपयांचा भूखंड देण्यासाठी लगबग सुरू झाली आहे.