डॉ. नागेश टेकाळेनैसर्गिक शेतीची घोषणा केली की ती लगेच कृतीत आली असे होत नाही. नैसर्गिक शेतीस निसर्गाची साथही हवी म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यांचे बांध उपयोगी वृक्षांनी समृद्ध असावे लागतात. त्यासाठी बांधाचे रुंदीकरण हवे. प्रत्येक वृक्षाखालील माती जिवाणूंनी समृद्ध असते, हीच माती वावरात फेकली की जमिनीचा प्रवास नैसर्गिक शेतीकडे होऊ लागतो..महाराष्ट्राच्या शेतीवर नुकताच झालेला वातावरण बदलांचा प्रभाव, ऑक्टोबर अखेरपर्यंत कोसळणारा पाऊस आणि आगामी काळात त्यावर शाश्वत उपाययोजना यावर मुंबईस्थित राजभवन येथे राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या पुढाकाराने नैसर्गिक शेती परिषद घेण्यात आली, ज्यामध्ये मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, विधान परिषद सभापती, उपसभापती यांच्यासह खासदार आणि मंत्रिमंडळामधील सदस्य उपस्थित होते..Natural Farming: नैसर्गिक शेतीचा संकल्प आणि संभ्रम.परिषदेचे मुख्य सूत्र होते ‘राज्यामधील पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणणार.’ राज्यात शेतीखालील क्षेत्र २५६ लाख हेक्टर तर प्रत्यक्ष पीक क्षेत्र १७४ लाख हेक्टर आहे. यातील २५ लाख हेक्टर म्हणजे अंदाजे १४ टक्के नैसर्गिक शेतीखाली आणणार, ही घोषणा निश्चितच स्तुत्य आहे..भविष्यामध्ये वातावरण बदल आणि पावसाचे वाढते प्रमाण पाहता यापुढे नैसर्गिक शेतीशिवाय शेतकऱ्यापुढे पर्याय नाही, हे सत्य आहे. राज्यातील लाखो हेक्टर जमीन पूर्णपणे वाहून गेली, अनेक ठिकाणी शेतजमिनीखालील खडक, दगड धोंडे वर आले आहेत. अशा जमिनीस पुन्हा वहिवाटीसाठी आणण्याकरिता नैसर्गिक शेतीशिवाय पर्याय नाही. प्रश्न उभा राहतो, खरंच शेतकरी हे करणार का?.Natural Organic Farming: पंचवीस लाख हेक्टर क्षेत्र सेंद्रिय शेतीखाली आणणार.सोयाबीन, ऊस आणि कापूस या पिकांनी शेतकऱ्यांना मारलेली मिठी आणि त्यात पुन्हा मक्याची गाठ त्यामुळे शासनाची ही घोषणा प्रत्यक्ष कृतीत येण्याऐवजी कागदावरच राहण्याची जास्त शक्यता वाटते. रासायनिक शेतीकडून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळविणे हे एवढे सोपे नाही, हा काही दिवसांचा, महिन्यांचा कालावधी नसून यासाठी चार ते पाच वर्षे लागतात..आपणच जर शेतकऱ्यांना बांधावर रासायनिक खते पोहोचविणार असू तर कोणता शेतकरी गांडूळ खत, शेणखत शेतात घालणार आहे? २५ लाख हेक्टरची उंच उडी घेण्यापेक्षा दोन हेक्टरच्या खालील शेतजमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना या प्रवाहात घेऊन प्रथम कर्जमुक्त करून त्यांना पहिल्या वर्षी फक्त डाळवर्गीय पिके खरीप आणि रब्बीसाठी घेऊन शासनाने त्याची उच्च दराने खरेदी केल्यास शेतकऱ्यांचा त्यावर विश्वास बसेल..Natural Farming: जमीन सुपीकतेसाठी नैसर्गिक शेती महत्त्वाची.नैसर्गिक शेती करणाऱ्या अनेक शेतकऱ्यांना मी भेटलो आहे, त्यातील एक गोष्ट माझ्या लक्षात आली ती म्हणजे हा शेतकरी नेहमीच कर्जमुक्त असतो, थोडक्यात कर्जमुक्त झाल्याशिवाय तो त्याच्या शेतीला जिवाणूंनी श्रीमंत करत नाही. यातील बरेच शेतकरी त्यांचे नैसर्गिक खत स्वत: तयार करतात, अनेक जण पंचगव्य जिवामृताचा वापर करतात..नैसर्गिक शेतीचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे भूजल साठा वाढण्यास हातभार लागतो. पडणाऱ्या पावसाचे पाणी नैसर्गिक जमिनीतून वाहून जात नाही तर ते जागेवरच मुरते. कारण नैसर्गिक कर्ब आणि उपयोगी जिवाणू पाण्यास जवळ घेतात आणि भूजलास समृद्ध करतात. एवढी २५ लाख हेक्टर जमीन नैसर्गिक करावयाची असेल तर एवढे शेणखत उपलब्ध आहे काय? पूर्वी घरोघर गायी आणि शेतात बैल बारदाना होता. हे दोन घटक नैसर्गिक शेतीसाठी आवश्यक आहेत पण आज ते तेवढ्या प्रमाणात उपलब्ध आहेत का? उत्तर नकारात्मक आहे..Natural Farming: नैसर्गिक शेतीने बळीराजा समृद्ध होणार.शेणामधील आवश्यक मूलद्रव्ये म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश पिकांना त्वरित उपलब्ध होतात पण पिकांचे अवशेष, पालापाचोळा जमिनीत गाडून त्यातील मूलद्रव्ये विद्राव्य स्थितीत आणण्यास कालावधी लागतो. म्हणूनच नैसर्गिक शेतीची घोषणा केली, की ती लगेच कृतीत आली असे होत नाही. नैसर्गिक शेतीस निसर्गाची साथही हवी म्हणूनच प्रत्येक शेतकऱ्यांचे बांध उपयोगी वृक्षांनी समृद्ध असावे लागतात. त्यासाठी बांधाचे रुंदीकरण हवे. कारण प्रत्येक वृक्षाखालील माती जिवाणूंनी समृद्ध असते, हीच माती वावरात फेकली की जमिनीचा प्रवास नैसर्गिक शेतीकडे होऊ लागतो. झाडावर पक्ष्यांचा किलबिलाट असेल तर त्यांच्या विष्ठेमधून बांधावरची माती अजून जास्त समृद्ध होते. ज्या शेतकऱ्यांचे बांध वृक्षांनी श्रीमंत आहेत अशांना या योजनेत प्राधान्य हवे..नैसर्गिक शेती उद्दिष्टपूर्तीसाठीभूतान, तसेच सिक्कीममधील शेतकरी सेंद्रिय शेती करतो. हिमालयाच्या कुशीत असूनही त्यांची शेती कधीही वाहून जात नाही. तेथील प्रत्येक शेतकरी अतिशय आनंदी हसतमुख असतो. कारण तो कर्जमुक्त आहे. येथील शेतकरी पारंपरिक धान्ये, फळे, भाजीपाला पिकवितात, त्यांची चव सुद्धा अप्रतिम असते. येथील हॉटेल उद्योग आणि पर्यटनाशी त्यांची शेती जोडलेली असते. हव्यास आणि आनंद हे दोन घटक एकाच तागड्यात राहू शकत नाहीत, हेच त्यांनी दाखविले आहे..Natural Farming: शाश्वत जीवनशैलीसाठी नैसर्गिक शेती आवश्यक.भूतान हे आशिया खंडामधील एकमेव आनंदी राष्ट्र आहे ते तेथील शेतकऱ्यांमुळेच! येथील याक हे पाळीव पशुधन शेतकऱ्यास मुबलक नैसर्गिक खत देते. ‘महाराष्ट्र राज्याची २५ लाख हेक्टर नैसर्गिक शेती’ ही घोषणा आणि या शेतीमुळे होणारे जमीन आणि माणसांच्या आरोग्याचे फायदे तळागाळापर्यंत जाणे गरजेचे आहे. शेतकरी यासाठी गंभीर होण्यापूर्वी शासन, लोकप्रतिनिधी, कृषी कर्मचारी यांनी जास्त गंभीर, संवेदनशील होणे गरजेचे आहे. एखाद्या गरीब शेतकऱ्यास या क्षेत्रात प्रवेश देण्यापूर्वी त्याच्यावर असलेली सर्व आर्थिक जबाबदारी शासनाने उचलावयास हवी..शासनाने सांगितले म्हणून कोणी नैसर्गिक शेती करणारा नाही, त्यासाठी त्या शेतकऱ्याकडे स्वत:चे इच्छाबळ, पर्यावरणाची जाण असणे गरजेचे आहे. पडलेल्या मुसळधार पावसामुळे अल्पभूधारक शेतकरी आज पूर्ण उद्ध्वस्त झाला आहे, याच शेतकऱ्यांना सर्व प्रथम शासनाने या पंचवीस लाख हेक्टर मध्ये समाविष्ट करून घ्यावे, त्याला कर्जमुक्त करून पहिले नैसर्गिक उत्पादन घरात येईपर्यंत त्याचे कुटुंब आनंदाने दोन घास खाऊ शकेल, एवढी आर्थिक मदत त्यास द्यावी. त्याच्या मुलामुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलावा, प्रसंगी मुलीच्या लग्नास शासकीय मदत सुद्धा करावी..‘पंचवीस लाख हेक्टर’ ही योजना मराठवाडा, विदर्भ भागामधील काही मोजक्या गावापासून सुरुवात केली तर यशोगाथा लवकर तयार होईल. तालुका कृषी अधिकाऱ्यांना गावातील असे शेतकरी दत्तक देवून या यशोगाथेस छानशी सोनेरी किनार मिळेल. ज्या गावात व गाव परिसरात लोकसंख्येच्या दहा बारा पटीत वृक्ष असतात अशा गावांना प्राधान्य द्यावे, शेतकऱ्यांना उत्कृष्ट प्रकारचे शेणखत मोफत पुरविणे ही जबाबदारी शासनाने घ्यावी..समाजकार्य करणाऱ्या संस्थांना या प्रवाहात समाविष्ट करून ‘उत्कृष्ट नैसर्गिक शेती करणारी गावे’ अशी पारितोषिके शासनातर्फे जाहीर करावी. अशा स्पर्धेतूनच आपला चांगला हेतू साध्य होऊन ते शाश्वत होतो. नैसर्गिक शेती ही शेतकऱ्यांना भविष्यात वातावरण बदल आणि कोसळणारा पाऊस यापासून मिळणारी निसर्ग निर्मित संरक्षण ढाल आहे. झेपेल एवढ्या संख्येने अशा ढाली तयार झाल्या तरच शेतकरी त्या हातात घेतील अन्यथा वृत्तपत्रात आलेली एक बातमी म्हणून काही दिवसांत ती विसरून सुद्धा जातील.: ९८६९६१२५३१ (लेखक शेती प्रश्नांचे अभ्यासक आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.