Pune APMC Agrowon
ॲग्रो विशेष

Pune APMC: पुणे बाजार समितीच्या सभापतिपदाची आज निवड

APMC Chairman: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सभापतीची निवड शुक्रवारी (ता. १८) होणार आहे. यासाठी ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप यांचे नाव आघाडीवर आहे.

गणेश कोरे

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवीन सभापतीची निवड शुक्रवारी (ता. १८) होणार आहे. यासाठी ज्येष्ठ संचालक प्रकाश जगताप यांचे नाव आघाडीवर आहे. काही दिवसांपूर्वी दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिला. त्यामुळे ही निवड प्रक्रिया होणार आहे. 

संचालक मंडळ नियुक्तीनंतर विविध गैरव्यवहारांमुळे बाजार समिती सातत्याने चर्चेत आहे. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी नुकतीच विधान परिषदेमध्ये बाजार समितीमधील गैरव्यवहारांच्या चौकशीची घोषणा केली. तर पणन संचालकांनी देखील एक चौकशी समिती नियुक्त केली आहे.

यामुळे गैरव्यवहार आणि चौकशांच्या फेऱ्यात अडकलेल्या बाजार समितीचे सभापती पद हे काटेरी मुकुट ठरणार आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रीय बाजाराचे विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडण्याच्या सूचना केल्याने, राष्ट्रीय बाजार झाल्यावर सभापती पद औट घटकेचे ठरणार आहे.

गोव्याची झिंग उतरली

दरम्यान, सभापती पदासाठी इच्छुकांनी काही संचालकांना घेऊन गोवा गाठले होते. संचालक मंडळ गोव्यात असतानाच विधान परिषदेमध्ये बाजार समितीमधील गैरव्यवहारांचा मुद्दा गाजला आणि पणनमंत्र्यांनी चौकशीचा आदेश दिल्याचे वृत्त गोव्यात धडकले आणि संचालकांची गोव्याची झिंग उतरल्याची चर्चा बाजार आवारात रंगली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Millet Processing Center: आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते ‘मिलेट उत्कृष्टता केंद्रा’चे भूमिपूजन

Livestock Compensation: राज्य सरकारचा मोठा निर्णय; अतिवृष्टीमुळे दगावलेल्या सर्वच पशुधनासाठी मिळणार मदत

Unseasonal Rain Impact: अवकाळी आणि गारपिटीमध्ये आंबा- काजू बागेची काळजी कशी घ्यावी?

Appointment of Land Surveyors: जिल्हास्तरावर निविदा प्रक्रियेद्वारे ‘भूमापकां’ची नियुक्ती

Free Electricity Scheme: मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेच्या सवलतीपोटी २,२९४ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT