Pune APMC
Pune APMCAgrowon

Pune APMC: अतिक्रमण कारवाई संथगतीने, मंत्र्यांच्या आदेशाची मोडतोड

Encroachment Action: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाने खिरापती सारख्या वाटण्यात आलेल्या टपऱ्यांवर कारवाईचा मुद्दा विधानपरिषदेत गाजल्यानंतरही, शुक्रवारी (ता.११) प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई संथगतीने सुरू केली.
Published on

Pune News: पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील संचालक मंडळाने खिरापती सारख्या वाटण्यात आलेल्या टपऱ्यांवर कारवाईचा मुद्दा विधानपरिषदेत गाजल्यानंतरही, शुक्रवारी (ता.११) प्रशासनाकडून अतिक्रमण कारवाई संथगतीने सुरू केली.

दरम्यान, संचालक मंडळाच्या ठरावाने थाटण्यात आलेल्या टपऱ्या अधिकृत असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले, तर ज्या अनधिकृत आहेत, त्यांची यादी तयार करून कारवाई केली जाईल असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Pune APMC
Pune APMC Scam: पुणे बाजार समितीचा गैरव्यवहार विधान परिषदेत गाजला

पुणे बाजार समितीमध्ये संचालक मंडळाने आपल्या बगलबच्चांना सुमारे ५० टपऱ्यांचे वाटप केले आहे. तर काही टपऱ्या अनधिकृतपणे उभारण्यात आल्या आहेत. तर अनेक ठिकाणी संचालकांच्या आशीर्वादाने अतिक्रमणे आहेत. याबाबत गुरुवारी (ता.१०) विधानपरिषदेत प्रश्‍न उपस्थित झाल्यानंतर तातडीने नाल्यावरील एक अतिक्रमण काढण्यात आले.

Pune APMC
Pune APMC Scam: बाजार समिती संचालकांची ‘ईडी’मार्फत चौकशी करा

मात्र संचालक मंडळाने वाटप केलेल्या टपऱ्यांबाबत प्रशासनाने सावध भूमिका घेत, या टपऱ्या ठराव केल्याने त्या अधिकृत असल्याचा पवित्रा प्रशासनाने घेतला आहे. यामुळे पणन मंत्र्यांच्या आदेशाची मोडतोड करून, संचालकांच्या टपऱ्या वाचविण्याचा खटाटोप प्रशासनाकडून सुरू आहे.

अनधिकृत टपऱ्यांची यादी करण्याचे काम सुरू आहे. त्याची यादी अंतिम झाल्यावर टपऱ्या हटविण्यात येतील.
डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com