Dairy Union
Dairy UnionAgrowon

Solapur Milk Union: सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ बरखास्त!

Dairy Cooperative Board Dissolved: सभासदांच्या हिताकडे दुर्लक्ष केल्याच्या कारणास्तव सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक मंडळ विभागीय उपनिबंधकांनी बरखास्त केले आहे. आता जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीनिवास पांढरे यांच्या नेतृत्वाखाली तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहे. अवघ्या तीन वर्षांत संचालक मंडळ दुसऱ्यांदा बरखास्त झाले आहे.
Published on

Solapur News: दूध उत्पादक सभासदांच्या हिताचा कारभार होत नसल्याचा ठपका ठेवत सोलापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघाचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ विभागीय उपनिबंधकांनी बरखास्त केले आहे. संचालक मंडळ बरखास्त केल्यानंतर आता जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीनिवास पांढरे यांच्या नेतृत्वाखालील तीन अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हा दूध संघाच्या कारभाराबाबत सोलापूर जिल्हा दूध संघ बचाव कृती समितीने ९ ऑगस्ट २०२४ रोजी दुग्ध विकास विभागाचे विभागीय उपनिबंधक राजकुमार पाटील यांच्याकडे तक्रार केली होती. बचाव समितीने या तक्रारीत ११ गंभीर मुद्दे मांडले होते. त्यानंतर विभागीय उपनिबंधक पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

Dairy Union
Dairy Farming : एका गाईपासून ३३ गायींपर्यंतचा प्रवास ; कल्पनाताईंच्या दुग्ध व्यवसायाची यशोगाथा

या चौकशी अहवालात संघाच्या संचालकांनी कामकाजात सभासदांच्या हिताचा विचार न करता, मनमानी केल्याचे आणि संघाला बाधा येईल, असे काम केल्याचा ठपका ठेवला आहे. त्यानंतर विभागीय उपनिबंधक पाटील यांनी संचालकांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर थेट संचालक मंडळ बरखास्त करण्याचा निर्णय दिला आहे.

Dairy Union
Dairy Development : पंढरपुरी म्हशी आणि देशी गायींमुळे विदर्भ, मराठवाडा दुग्धविकास प्रकल्पाला चालना

त्यानंतर आता जिल्हा विशेष लेखा परीक्षक श्रीनिवास पांढरे यांच्या अध्यक्षतेखाली दुग्ध सहकारी संस्थांच्या सहायक निबंधक डॉ. वैशाली साळवे आणि दुग्ध विभागाचे सहकार अधिकारी व्ही. जे. वडतिले अशा तीन अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ नेमण्यात आले आहे.

सलग दुसऱ्यांदा प्रशासकीय मंडळ

संचालकांच्या बेजबाबदारपणामुळे या आधीही ८ मार्च २०२१ मध्ये तत्कालीन संचालक मंडळ बरखास्त झाले होते. तसेच तत्कालीन विभागीय दुग्ध उपनिबंधक सुनील शिरापूरकर यांच्या नेतृत्वाखालील तीन सदस्यांचे प्रशासकीय मंडळ नियुक्त झाले होते. त्यानंतर २०२२ मध्ये संचालक मंडळाची निवडणूक होऊन रणजितसिंह शिंदे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ अस्तित्वात आले. त्यांच्याकडून मोठ्या आशा दूध उत्पादकांना होत्या, पण आता पुन्हा एकदा तोच प्रकार झाल्याने, अवघ्या तीन वर्षांतच त्यांना पायउतार होण्याची वेळ आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com