Agriculture Irrigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : पुणे जिल्ह्यात रब्बी हंगामासाठी आवर्तनाला सुरुवात

Rabi Season : यंदा खरिपात पाऊस कमी झाल्याने धोक्यात गेलेल्या खरीप हंगामानंतर, शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर आहे.

Team Agrowon

Pune News : यंदा खरिपात पाऊस कमी झाल्याने धोक्यात गेलेल्या खरीप हंगामानंतर, शेतकऱ्यांची भिस्त रब्बी हंगामावर आहे. रब्बी हंगामातील पिकांना योग्य प्रमाणात पाणी मिळावे यासाठी पुढील ६० दिवसांत सुमारे साडेपाच टीएमसी पाणी सोडण्यास जलसंपदा विभागाने सुरुवात केली आहे. धरणातील उपलब्ध पाणी पाहता उन्हाळी आवर्तनाचे नियोजन होणार आहे.

रब्बी हंगामासाठी हवेली, इंदापूर आणि दौंड या भागांतील शेतकऱ्यांनी पाणी सोडण्याची मागणी केली होती. या मागणीनुसार रब्बी हंगामासाठी ७०० क्युसेकने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली.

साठ दिवसांत रब्बीसाठीचे सुमारे साडेपाच टीएमसी पाण्याचे आवर्तन पूर्ण करण्यात येणार आहे. ऑक्टोबरमध्ये चांगला प्रतीचा पाऊस होईल, अशी अपेक्षा होती; मात्र परतीच्या पावसाने धोका दिल्याने धरणांचा पाणीसाठा कमी झाला परिणामी टंचाईच्या झळा आतापासून बसण्याची शक्यता आहे.

पुरंदर तालुक्यात टँकर सुरू

जिल्ह्यात केवळ पुरंदर तालुक्यात टँकर सुरू आहेत. अन्य तालुक्यातील सद्यःस्थिती चांगली असली तरी आगामी काळात पुढे टंचाईच्या झळा बसण्याची शक्यता आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात २५.५४ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध आहे.

पैकी साडेपाच टीएमसी पाणी रब्बीसाठी सोडण्यात येणार आहे. उन्हाळ्यात पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता कमी असल्याने शेतीसाठी दोन टीएमसी पाणी सोडण्याचा आदेश कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी दिला होता. त्यानुसार पुणे महापालिकेला पाणी कपात करावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT