Agriculture Irrigation : उपळाईच्या शेतकऱ्यांचा पाण्यासाठी ‘रास्ता रोको’

Protest for Water : उपळाई बुद्रूक परिसरात पाणी येत नसल्याने, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने, नागरिकांनी माढा-शेटफळ रस्त्यावर शनिवारी सकाळी एक तास रस्ता रोको आंदोलन केले.
Water Protest
Water ProtestAgrowon
Published on
Updated on

Solapur News : सीना माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यासाठी संबंधित विभागाकडून शेतकऱ्याच्या ऊस बिलातून पाणीपट्टी कपात करून घेतली जाते. परंतु या योजनेचे सध्या पन्नास दिवसांहून अधिक काळ झाले पाणी सुरू असताना देखील अधिकाऱ्यांच्या निष्काजीपणामुळे उपळाई बुद्रूक परिसरात पाणी येत नसल्याने, पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत चालल्याने, नागरिकांनी माढा-शेटफळ रस्त्यावर शनिवारी सकाळी एक तास रस्ता रोको आंदोलन केले.

यंदा पाऊस कमी झाल्याने शेतकऱ्यांची आशा सीना - माढा उपसा जलसिंचन योजनेच्या पाण्यावर आहे. या योजनेचे पाणी सुरू होऊन जवळपास दोन महिने उलटले असून, या पाण्यासाठी या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसबिलातून पाणीपट्टी देखील संबंधित विभागाच्या वतीने कपात करण्यात आली आहे.

Water Protest
Jaykwadi Water Issue : बियर कंपन्या जगवायच्या आणि शेती उजाड करायची का?

तरीदेखील अधिकाऱ्यांच्या निष्काजीपणामुळे या भागांत अद्याप पाणी पोहचले नसल्याने, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी होती. माढा पोलिसांच्या मध्यस्थीने नायब तहसीलदार विजय लोकरे यांना निवेदन देऊन नागरिकांनी आंदोलन मागे घेतले.

Water Protest
Jaykwadi Water Issue : ‘मुळा’तून चार हजार क्युसेकने ‘जायकवाडी’साठी सोडले पाणी

यावेळी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य दीपक देशमुख, मल्लिकार्जुन झाडबुके, संजय नागटिळक, मनोज गायकवाड उपस्थित होते.

आंदोलनकर्त्यांना दोन दिवसांपूर्वीच पाणी सोडण्याचे तोंडी आश्वासन दिले होते. तरीदेखील ते आंदोलनावर ठाम होते. उद्यापासून उपळाई भागात टप्प्याटप्प्याने सर्वत्र पाणी पोचवण्यासाठी प्रयत्न करू.
नारायण आल्हाट, अभियंता, भीमा पाटबंधारे विभाग भीमानगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com