Orchard Pruning  Agrowon
ॲग्रो विशेष

Orchard Pruning : फळबागांच्या छाटण्या पावसाअभावी रखडल्या

Fruit Crop : मोहोळ तालुका उजनी डावा कालवा, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे बागायती झाला आहे. मात्र उजनी धरणातील पाणी पातळी खालावल्याने तसेच आष्टी तलावातील पाणी कमी झाल्याने बागायती क्षेत्र धोक्यात आले आहे.

सुदर्शन सुतार

Solapaur News : गेल्या दोन वर्षांपासून मोहोळ तालुक्यात पाऊस नसल्याने तसेच विहिरी व बोअरच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात झालेली घट यामुळे थोड्याफार पाण्यावर जोपासलेली ऊस व मका ही पिके वाया गेली, तर बोर, डाळिंब यांसारख्या फळबागांचे सरपण झाले आहे. पाण्याअभावी भागांच्या छाटण्या खोळंबल्या आहेत.

मोहोळ तालुका उजनी डावा कालवा, आष्टी तलाव, आष्टी उपसा सिंचन योजनेमुळे बागायती झाला आहे. मात्र उजनी धरणातील पाणी पातळी खालावल्याने तसेच आष्टी तलावातील पाणी कमी झाल्याने बागायती क्षेत्र धोक्यात आले आहे.

सर्वसाधारण मार्चमध्ये बोर बागा छाटल्या जातात. तसेच ज्या शेतकऱ्याला पाणी उपलब्ध आहे ते पेरू, सीताफळ या फळबागा छाटतात. मात्र पाणी नसल्याने त्या छाटण्या रखडल्या आहेत. कमी खर्चात उत्पादन येणारे म्हणून अनेक शेतकऱ्यांनी बोरीच्या बागा लावल्या होत्या.

मात्र वरचेवर मजुरांच्या अडचणीमुळे त्या काढूनही टाकल्या. परंतु ज्या आहेत त्यांना पाणी नसल्याने त्यांच्या काड्या वाळल्या आहेत. त्यांची सरपणासारखी अवस्था झाली आहे. त्यामुळे पावसाची वाट पाहणे व नंतरच छाटणी करणे हा एकमेव पर्याय आहे.

द्राक्ष बागांच्याही काही शेतकऱ्यांनी छाटण्या केल्या आहेत. मात्र तीव्र उन्हामुळे त्यांचे कोंब फुटेनात. त्यामुळे पाऊस पडल्यावरच बागा छाटणीच्या कामाला वेग येणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Parbhani DCC Bank Election: परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ८ जागांचे निकाल जाहीर

CSC Crop Insurance Services: विमा हप्त्याव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क देऊ नका : दत्तकुमार कळसाईत

Paddy Transplantation: डहाणू तालुक्यात पावसाच्या विश्रांतीने बळीराजा शिवारात

Road Widening Project: मोहोळ-वळसंग रस्ता रुंदीकरणासाठी ९२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन

MIDC Industries Face Warning: शेतीचे नुकसान; रासायनिक कंपन्यांना इशारा

SCROLL FOR NEXT