Grape Pruning Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Pruning : जुन्नरमधील द्राक्ष बागांच्या फळ छाटणीची कामे थांबली

Grape Farming : सततच्या पावसामुळे व पावसाळी वातावरणामुळे सद्यःस्थितीत जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांच्या फळ छाटणीची कामे थांबली आहेत.

Team Agrowon

Narayangaon News : ‘‘मागील चार दिवसांमध्ये जुन्नर तालुक्यात सरासरी ९५ मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. फळ भाजीपाला पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शेतातील पाण्याचा वेळीच निचरा करणे आवश्यक आहे.

सततच्या पावसामुळे व पावसाळी वातावरणामुळे सद्यःस्थितीत जुन्नर तालुक्यातील द्राक्ष बागांच्या फळ छाटणीची कामे थांबली आहेत. ऑक्टोबर महिन्यात छाटणीच्या कामाला वेग येईल, अशी माहिती कृषी विज्ञान केंद्राचे अध्यक्ष अनिल मेहेर, तालुका द्राक्ष उत्पादक संघाचे उपाध्यक्ष हरिभाऊ वायकर यांनी दिली.

जुन्नर तालुक्यात २३ सप्टेंबरपासून दुपारी व रात्री पाऊस पडत आहे. मागील आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण असून सूर्यप्रकाशाचा अभाव आहे. तालुक्यात २३ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबरपर्यंत सरासरी ९५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला आहे.

सततच्या पावसामुळे झेंडू, कांदा, टोमॅटोसह इतर फळ भाजीपाला पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. काळ्या कसदार जमिनीत पाणी साठल्यास सोयाबीन या प्रमुख पिकासह भाजीपाला पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. पिकांचे नुकसान कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी वेळीच खते, फवारणीचे नियोजन करणे आवश्यक आहे.

मुसळधार पावसामुळे जुन्नरसह सांगली, सोलापूर, नाशिक, सटाणा भागांत द्राक्षाच्या फळ छाटणीची कामे नियोजनानुसार करता आली नाही. १० ऑक्टोबरपर्यंत पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यानंतर या कामाला वेग येईल. ऑक्टोबर अखेरपर्यंत छाटणीची कामे पूर्ण होतील.
हरिभाऊ वायकर, उपाध्यक्ष, जुन्नर तालुका द्राक्ष उत्पादक संघ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT