Food Processing Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture and Food Processing Scheme : मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेसाठी ७५ कोटी रुपयांची तरतूद

Aslam Abdul Shanedivan

Pune News : राज्यातील शेतकऱ्यांसाठी शंभर टक्के राज्य पुरस्कृत असणारी मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजना सुरू करण्यात आली असून या योजनेतून ७५ कोटी रुपये रकमेची तरतूद करण्यात आली आहे. या योजनेतून अन्नप्रक्रिया उद्योगाला चालना देणे, शेतमालाचे मूल्यवर्धन करण्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पांना प्रोत्साहन देणे, उत्पादित अन्न पदार्थाच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासह ऊर्जेची बचतीसाठी प्रकल्पांच्या आधुनिकीकरणास प्रोत्साहन देणे, अशी उद्दिष्ट्ये ठेवण्यात आली आहेत.

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत नवीन अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करण्यासह कार्यरत असणाऱ्या अन्न प्रक्रिया उद्योगांचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरण केले जाणार आहे. तसेच पीक आधारित अन्न प्रक्रिया उद्योगाशी निगडित काढणीपश्चात पूर्व प्रक्रिया केंद्र व एकात्मिक शीतसाखळी निर्माण केली जाणार आहे.

या योजनेतंर्गत तृणधान्य, कडधान्य, फळे, भाजीपाला, तेलबिया, मसाला, औषधी व सुगंधी वनस्पती इ. प्रक्रिया उद्योंगाचा समावेश असेल. तर यात गुळ उद्योग, वाईन उद्योग, दुग्ध व पशुखाद्य प्रकल्पांसह भरडधान्यावरील कृषि व प्रक्रिया आणि मूल्यवर्धनावर भर देण्यात येणार आहे. तर या योजनेचा वैयक्तिक लाभार्थी-वैयक्तिक उद्योजक, सक्षम प्रगतीशिल शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, नवउद्योजक, भागीदारी प्रकल्प (Partnership) आणि भागीदारी संस्थांना (LLP) लाभ घेता येईल. तसेच शासनाच्या कुटुंब व्याखेनुसार (पती, पत्नी व त्यांची अपत्ये) एकाच कुटुंबातील केवळ एकाच लाभार्थ्याला योजनेंतर्गचा लाभ घेता येईल. मात्र एकाच कुटुंबातील त्या व्यक्तीला प्रकल्पाचे स्तरवृद्धी, विस्तारीकरण व आधुनिकीकरणासाठी असणाऱ्या योजनेचा एकदाच लाभ घेता येईल.

मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत राज्य शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाणार असून यामध्ये कारखाना व मशिनरी आणि तांत्रिक बांधकामाच्या एकूण खर्चाच्या ३० टक्के अनुदान किंवा कमाल मर्यादा ५० लाख रूपये असेल. तर अनुदानाचे प्रमाण ६०:४० असून बँक कर्जाशी निगडित अनुदान दोन समान टप्प्यात असणार आहे.

दरम्यान मुख्यमंत्री कृषी व अन्न प्रक्रिया योजनेतंर्गत राज्य शासनाकडून सन २०१८-१९ ते सन २०२३-२४ पर्यंत एकूण ५८४ लाभार्थ्यांस रु. २०१.४७ कोटी रकमेच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. तर यंदा २०२४-२५ मध्ये एकूण २०७ प्रकल्पांना रु. ७५ कोटी अनुदानाच्या रक्कमेस मान्यता देण्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT