Kharif season preparatory review meeting Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

IAS Buvneshwari S : रासायनिक खते योग्यवेळी उपलब्ध करून देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

Team Agrowon

Washim News : वाशीम जिल्ह्यात खरीप हंगामात विवि‍ध पिकांचे उत्पादन शेतकरी घेतात. या खरीप हंगामात बियाणे, रासायनिक खते योग्यवेळी उपलब्ध करून देवून त्यांची खरीप हंगामात गैरसोय होणार नाही यादृष्टीने कृषी विभागाने दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिले.

खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठक बुवनेश्‍वरी एस. यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, सहाय्यक जिल्हाधिकारी अपूर्वा बासूर यांच्यासह जिल्ह्यातील सर्व विभागाचे विभागप्रमुख व कृषी विद्यापिठाचे शास्त्रज्ञांची उपस्थिती होती.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा यांनी सादरीकरण करताना खरीप हंगामाची पूर्वतयारी म्हणून ४ लाख ५ हजार १८० हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आल्याचे सांगितले. यामध्ये प्रामुख्याने सोयाबीन ३ लाख ७ हजार २७५ हेक्टर, तूर ६१ हजार हेक्टर, कपाशी ३० हजार ८२० हेक्टर, खरीप ज्वारी ६०० हेक्टर, मुग २ हजार १०० हेक्टर, उडीद २ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. पेरणीसाठी लागणा-या बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.

सोयाबीन पिकाकरिता जिल्ह्याचे बियाणे बदलाचे प्रमाण एकूण २९ टक्के असून त्याकरिता ६६ हजार ८३२ क्विंटलची बियाणे मागणी नोंदविण्यात आली आहे. उर्वरित लागणारे बियाणे शेतक-याकडे घरगुती पद्धतीने जतन करण्यात आलेले आहे. कापूस बीटी बियाण्याची एक लाख ५४हजार १०० पाकिटाची मागणी नोंदविण्यात आली असून मे अखेरपर्यंत उपलब्ध होण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे.

एकंदरीत सर्व पिकाच्या बियाण्याची उपलब्धता होईल व कुठलीही टंचाई भासणार नाही. रासायनिक खताची ७५हजार ६० टन खताची मागणी करणयत आली असून ७२ हजार ३०० टनाचे वाटप कृषी आयुक्तालयाकडून मंजूर करण्यात आले आहे. खताचा मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध होईल. त्याप्रमाणे नॅनो युरिया १८५०० बॉटल्स व नॅनो डीएपी पाच हजार बॉटल्सचे वाटप मंजूर झाले आहे.

घरगुती बियाण्याची उगवणक्षमता व बीजप्रक्रिया सयंत्राद्वारे बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाद्वारे प्रचार प्रसार करून बीजप्रक्रिया करूनच पिकाची पेरणी करण्याबाबत नियोजन केले आहे. सोयाबीनची बीबीएफ यंत्राद्वारे किंवा सरी वरंबा पद्धतीने लागवड करण्याबाबतचे नियोजन करण्यात आले आहे, असे शहा म्हणाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Ownership: जमीन भोगवटादार अन् मालकी हक्क

Manikrao Kokate: शह-काटशहचे बळी कोकाटे

SMART Agri Project: ‘स्मार्ट’ पाऊल पुढे पडो

Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

Ajit Pawar: विनंती करतो, जनतेला हेलपाटे मारण्यास लावू नका: अजित पवार

SCROLL FOR NEXT