Alampatti Dam: कर्नाटकने अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये : मुख्यमंत्री

CM Devendra Fadnavis: ‘‘कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदीकाठच्या परिसराला फटका बसू शकतो.
CM Devendra Fadnavis
CM Devendra FadnavisAgrowon
Published on
Updated on

Pune News: ‘‘कृष्णा नदीवरील अलमट्टी धरणाच्या जलाशय पातळीची उंची वाढविल्यास महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांसह, कृष्णा नदीकाठच्या परिसराला फटका बसू शकतो. त्यामुळे अलमट्टीची उंची वाढवू नये, यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत,’’ अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांना पत्राद्वारे केली आहे.

CM Devendra Fadnavis
CM Devendra Fadnavis: गायकवाड यांच्या हल्लेखोरांवर कडक कारवाई करू: मुख्यमंत्री

‘‘उंची वाढविली गेल्यास सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूरपरिस्थितीत भर घालण्यासारखेच होईल. अलमट्टी धरणाच्या पाण्यामुळे कृष्णा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या पात्रात गाळ साचण्याचे प्रमाण वाढले आहे.

CM Devendra Fadnavis
Alamatti Dam : ‘अलमट्टी’ची उंची वाढवण्याचा निर्णय तातडीने मागे घ्या

त्यामुळे नद्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेवर झाला आहे. पुराचे पाणी ओसरण्याची गती संथ झाली आहे. बंधाऱ्यामध्येही मोठ्या प्रमाणात गाळ साचू लागला आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक भागांत पूरस्थिती निर्माण होऊ लागली आहे.

याचा पिकाऊ शेत जमिनीला फटका बसणार आहे. या सर्वांचा विचार करता, दोन्ही राज्यांतील कृष्णा नदी काठच्या गावांचा आणि नागरिकांच्या हितासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढविण्याच्या निर्णयाचा कर्नाटक शासनाने पुनर्विचार करावा, त्यांना निर्देश देण्यात यावेत,’’ अशी विनंती श्री. फडणवीस यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com