Nilesh Lanke
Nilesh Lanke Agrowon
ॲग्रो विशेष

Nilesh Lanke Latest : शेतकऱ्यांना तातडीने भरपाई द्या; नीलेश लंकेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Team Agrowon

Nagar News : पारनेर तालुक्यातील वनकुटे, वडगाव सावताळ, ढवळपुरी, गाजीपूर, खडकवाडी, पळशी या गावांत सलग तीन दिवस वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

या नुकसानीचे पंचनामे (Crop Damage Survey) करून तातडीने भरपाई द्या, अशी मागणी आमदार नीलेश लंके यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी मंगळवारी (ता. ११) पारनेर तालुक्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. त्यावेळी आमदार लंके यांनी त्यांना निवेदन दिले.

या वेळी माजी सरपंच राहुल झावरे, बा. ठ. झावरे, ज्येष्ठ नेते भागूजी झावरे, बाळासाहेब खिलारी, डॉ. नितीन रांधवन, डॉ. सुनील गंधे, सरपंच प्रकाश राठोड, भाऊसाहेब चौरे, रामा तराळ उपस्थित होते.

लंके यांनी निवेदनात म्हटले आहे, की सप्टेंबर २०२२ मध्ये झालेल्या अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले. त्याची भरपाई मिळणे अद्याप बाकी असतानाच, आता पुन्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

वनकुटे, पळशी, खडकवाडी भागात खूप मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाल्याने पिके, फळबागा व घरांचेही नुकसान झालेले आहे. त्यामुळे मागील वर्षी व काल झालेल्या नुकसानीची भरपाई तातडीने द्यावी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pandharpur News : २ जूनपासून भाविकांना घेता येणार श्री विठ्ठल-रखुमाईचं पदस्पर्श दर्शन!

Summer Heat : दिवसा उकाडा, रात्री तडाखा

Soybean Seeds : उगवणशक्ती तपासूनच सोयाबीनचे घरचे बियाणे वापरावे

Water Crisis : महाडला पाणीटंचाईचे उग्ररूप

Water Crisis : जिंतूर तालुक्यात जलसंकटाची गडद छाया; सेलू तालूक्याला प्रशासनाचा आधार सोडणार आवर्तन

SCROLL FOR NEXT