Pune News: दौंड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील अनेक गावांसह राहू बेट परिसराला पडलेला अवैध सावकारीचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत चालला आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक गुलामगिरीत अडकू लागला असून यवत पोलिस ठाण्यात यासंदर्भात अत्यल्प प्रमाणात तक्रारी दाखल होऊ लागल्या आहेत. .मात्र याबाबत प्रशासनाकडून कारवाईकडे काणाडोळा केला जात आहे. परिणामी, सावकारांचा धंदा कुठल्याही आडकाठीविना तेजीत सुरू आहे.स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही सावकार शेतकऱ्यांना तात्पुरत्या गरजेच्या वेळी व्याजाने पैसे देतात..Moneylender Surrender: फरार सावकाराची अखेर शरणागती .त्यानंतर, त्यांनी वेळेवर पैसे परत न केल्यास जमिनींचे खरेदीखत स्वतःच्या किंवा आपल्या ओळखीच्या लोकांच्या नावावर करून घेतात. आतापर्यंत राहू व आसपासच्या परिसरातील पंधरा ते वीस शेतकऱ्यांच्या जमिनी या पद्धतीने सावकारांनी ताब्यात घेतल्या आहेत..Moneylenders Loan Issue: अमरावती जिल्ह्याला सावकारी विळखा.ग्रामपातळीवरील या सावकारी रॅकेटवर अंकुश ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी विविध सामाजिक संस्थांकडून होत आहे. दरम्यान, या प्रकरणाबाबत यवतचे पोलिस निरीक्षक नारायण देशमुख यांच्याशी वारंवार संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही..दहशतीमुळे चिडीचूप...तालुक्यात बोटावर मोजण्याइतकेच अधिकृत सावकार आहेत. अवैध सावकारकीचे मात्र मोठे पेव फुटले असून, ज्यादा रकमेने व्याज आकारणी करत असल्यामुळे ते मालामाल झाले आहेत. त्यांची दहशत व त्यांच्यावरील बड्यांचा वरदहस्त यामुळे सर्वसामान्य नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत, असा सूर या परिसरात ऐकायला मिळत आहे..सावकारांनी व्याजापोटी जमिनी, चारचाकी व दोन चाकी गाड्या बळकवल्या आहेत. मुदलापेक्षा चार पटीने व्याज आकारले जाते. राजकीय स्वार्थापोटी धनदांडग्या सावकारांना पोसण्याचे काम सुरू आहे. गुंडगिरीमुळे सर्वसामान्य नागरिक त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास धजावत नाहीत. वरिष्ठ अधिकारी या मंडळींना पाठिशी घालतात. अवैध सावकारांच्या विरोधात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयाकडे तक्रार करणार आहोत.विठ्ठल थोरात, अध्यक्ष, जनहित रक्षक सेवाभावी संस्था.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.