Eknath Shinde : पीक नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर

Team Agrowon

गेल्या दोन दिवसांत राज्यातील विविध भागात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने धूमाकुळ घाताला आहे.

Eknath Shinde | Agrowon

अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याच्या कष्टाची माती झाली आहे.

Crop Damage | Agrowon

अशातच आपला दोन दिवसीय अयोध्या दौरा संपल्या संपल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला आहे.

Eknath Shinde | Agrowon

पीक नुकसानीच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.

Eknath Shinde | Agrowon

गारपीट आणि अवकाळीचा फटका बसलेल्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील बिजोटे, आखतवाडे, निताणे गावातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली.

Eknath Shinde | Agrowon

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित होते.

Eknath Shinde | Agrowon

दरम्यान, राज्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Crop Damage | Agrowon
Mango On EMI | Agrowon