Farmer Giving a Statement  Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage Compensation : रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या

Farmer Issue : रब्बी पिकांचे मॉन्सूनोत्तर पावसामुळे अतोनात नुकसान झाले होते. याबाबत प्रशासनाला कळवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. म्हणून शेतकऱ्यांनी प्रशासनाला निवेदन दिले आहे.

Team Agrowon

Washim News : रब्बी पिकांचे मॉन्सूनोत्तर पावसामुळे अतोनात नुकसान झाले होते. प्रत्यक्षात फुलोऱ्यातील हरभऱ्याचे पीक मोडून दुबार पेरणी करावी लागली. त्याबाबत प्रशासनाला कळवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही.

मागण्या पूर्ण झाल्या नाहीत २६ जानेवारीपासून मंगरूळपीर तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करू, असा इशारा वनोजा येथील शेतकऱ्यांनी दिला आहे. मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन दिले आहे. निवेदनानुसार, परंतु या निवेदनावर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे वनोजा परिसरातील बरेच शेतकरी

पीकविमा अग्रिम, तसेच २०२१ च्या दुष्काळ निधीच्या शासन मदतीपासून अद्यापही वंचित आहेत. याबाबत संबंधित तलाठी, कृषी सहायक पंचनामे करण्यासाठी वरिष्ठांचे आदेश नाहीत, असे सांगत आहेत.

नुकसानीबाबत कळवूनही पंचनामे होईना

जिल्ह्यात काही ठिकाणी नोव्हेंबरच्या शेवटी व डिसेंबरच्या सुरुवातीस रब्बी पिकांच्या नुकसानीचे पंचनामे झाले. त्यांनी नुकसान भरपाईसाठी निधी मागणी केली आहे. मात्र काही ठिकाणी रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे.

याबाबत प्रत्यक्ष कळवूनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे नरेंद्र राऊत, राजेश महल्ले व इतर शेतकरी प्रजासत्ताक दिनापासून मंगरूळपीर तहसील कार्यालयासमोर उपोषण करणार आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Issue: पूल नसल्यामुळे गावात येईना वाहन; शेतीमालाची करता येईना विक्री

Farmer Demand: केळीची विना परवाना खरेदी, खरेदीदारांची मनमानी बंद करा

Hydroponics Farming: कमी जागेत होणारी पाण्यावरची हायड्रोपोनिक्स शेती

Fertilizer Price Issue: नायगावमध्ये रासायनिक खतांची अधिकच्या दराने विक्री

Geo Tagging Inspection: पथकाकडून विमा संरक्षित बागांची पाहणी

SCROLL FOR NEXT