Agriculture Electricity agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Electricity : शेतीसाठी पुरेसा वीजपुरवठा द्या

Rabi Season : खरिपातील कपाशी, तूर तसेच रबी हंगातील गहू, हरभरा पिकांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु सध्या कृषिपंपांना पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने दोन्ही हंगामातील पिके धोक्‍यात आली आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : खरिपातील कपाशी, तूर तसेच रबी हंगातील गहू, हरभरा पिकांना पाणी देण्याची गरज आहे. परंतु सध्या कृषिपंपांना पुरेसा वीजपुरवठा होत नसल्याने दोन्ही हंगामातील पिके धोक्‍यात आली आहेत. पीक वाचविण्यासाठी नियमित वीजपुरवठा करावा, अशी मागणी नेर परिसरातील शेतकऱ्यांनी वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे केली.

शेतीसाठी आठ तास वीजपुरवठा होत असल्याचा दावा शासनस्तरावरून केला जातो. मात्र प्रत्यक्ष परिस्थिती यापेक्षा काही वेगळीच आहे. कृषिपंपाला अवघा चार तास वीजपुरवठा केला जात आहे. तो सुद्धा अनियमित असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत सातत्याने भर पडत आहे.

चार तास देखील अनियमित वीजपुरवठा होत असल्याने इतक्‍या कमी कालावधीत पिकाला पाणी देणे शक्‍य होत नाही. त्याचा परिणाम खरीप आणि रबी हंगामातील पिकांच्या वाढीवर झाला आहे. याचा फटका थेट उत्पादकतेला बसतो. वन्यप्राण्यांपासून पीक वाचविण्याचे आव्हान शेतकऱ्यांसमोर आहे.

जीव धोक्‍यात घालून शेतकरी शिवारातील पीक वाचविण्यासाठी धडपड करतो. त्यात अपुऱ्या वीज पुरवठ्‍‌याच्या अडचणीची नवी भर पडली आहे. ही समस्या मानवनिर्मित असल्याने किमान यापासून तरी शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, अशी मागणी करण्यात आली. काही शेतकऱ्यांचा कापूस वेचणी होऊन घरात आला आहे.

काही शेतकऱ्यांची कापूस लागवड उशिराची आहे. सध्या हे पीक ताणावर असल्याने त्याला वाचविणे गरजेचे आहे. त्याकरिता पाणी द्यावे लागणार आहे. शेतकऱ्यांकडे ओलितासाठी विहीर, बोअरवेल असे पर्याय आहेत. परंतु पाण्याची उपलब्धता असताना उपशाकरीता वीज मिळत नसल्याची स्थिती आहे.

विद्युत रोहित्र बिघडणे, फ्यूज उडणे असे प्रकारही या भागात वाढीस लागले आहेत. त्यावर नियंत्रणासाठी देखील पुढाकार घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. नेर तालुक्‍यातील कोव्हळा, पिंपळगाव, व्याहाळी या गावांतील शेतकऱ्यांनी या प्रश्‍नावर वीज कंपनीच्या सहाय्यक अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी अभियंत्यानी वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आश्‍वासन दिले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Forest Fire : वणवे नियंत्रणासाठी जनजागृती करण्याची गरज

Sugarcane Labor Migration : निवडणूक संपताच ऊसतोड मजुरांचे स्थलांतर

Sugarcane FRP : मंडलिक साखर कारखाना इतरांच्या बरोबरीने दर देणार

Milk Rate : देशातील दूध उत्पादनात ४ टक्के वाढ; केंद्रीय मंत्र्यांची माहिती

SCROLL FOR NEXT