Milk Subsidy Protest Agrowon
ॲग्रो विशेष

Milk Subsidy : दूध अनुदानासाठी ‘जनहित’चे टँकर अडवून आंदोलन

Milk Rate : गेल्या काही महिन्यांपासून गाईच्या दूधदरात सातत्याने घसरत होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे दुग्धविकासमंत्री विखे पाटील यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमधील दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.

Team Agrowon

Solapur News : राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घोषणा करूनही दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान अद्याप मिळालेले नाही, त्यामुळे संतप्त झालेल्या जनहित शेतकरी संघटनेने वडवळ येथील हॅट्सन दूध डेअरीसमोर संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्त्वाखाली दुधाचा टँकर अडवून घोषणाबाजी करीत आंदोलन केले.

गेल्या काही महिन्यांपासून गाईच्या दूधदरात सातत्याने घसरत होत आहे. या पार्श्‍वभूमीवर राज्याचे दुग्धविकासमंत्री विखे पाटील यांनी जानेवारी आणि फेब्रुवारीमधील दुधाला प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.

पण अद्याप घोषणा प्रत्यक्षात आली नाही. केवळ घोषणा करून शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोप करत जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष देशमुख यांनी कार्यकर्त्यांसह वडवळ येतील हॅट्सन दूध डेअरीसमोर आंदोलन केले.

शेतकऱ्यांसह कार्यकर्त्यांनी या वेळी सरकारविरोधात जोरजोरात घोषणाबाजी केली. तातडीने हे अनुदान द्या, नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा या वेळी देण्यात आला. श्री. देशमुख म्हणाले, की शासन व दुग्धविकासमंत्री दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी त्यांच्या भावनांशी खेळ सुरू केला आहे.

पण आम्ही आता गप्प बसणार नाही, असे ते म्हणाले. या वेळी नाना मोरे, चंद्रकांत निकम, बिरू वाघमोडे, आकाश खरात, पिंटू पवार, सचिन काशीद, ज्ञानेश्वर खरात, सागर काशीद, समाधान काशीद, समाधान दळवी आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Navratri Festival: शक्ती रुपेन संस्थितः

Shaktipeeth Highway Protest: ‘शक्तिपीठ’विरोधात १३ जिल्ह्यांत एल्गार; कोल्हापुरातील बैठकीत निर्धार

State Cooperative Bank Anniversary: राज्य सहकारी बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त बालनाट्याचा उपक्रम

Someshwar Sugar Factory Election: सोमेश्वरच्या कारभाऱ्यांचा आज होणार फैसला; मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष

Dimbhe Dam Water Leakage: डिंभे धरणातून होतेय पाण्याची गळ

SCROLL FOR NEXT