Horticulture Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : विमा कवचामुळे रायगडमध्ये फळपिकाला संरक्षण

Fruit Crop : जिल्ह्यामध्ये आंबा व काजू पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असली तरी बदलत्या हवामानामुळे अनेकदा फळ पिके धोक्यात येतात.

Team Agrowon

Mahad News : जिल्ह्यामध्ये आंबा व काजू पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात होत असली तरी बदलत्या हवामानामुळे अनेकदा फळ पिके धोक्यात येतात. उत्पादनावर परिणाम झाल्‍याने शेतकरी आर्थिक संकटात सापडतात.

आता अशा संकटांचा सामना करण्यासाठी रायगडामध्ये फळपीक विमा योजनेला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी या फळपीक विमा योजनेचा लाभ घेत फळबागा संरक्षित कराव्यात, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.

बदलते हवामान, वादळी वारे, मुसळधार पाऊस, गारपिटीचा फळ पिकांवर परिणाम होतो. जिल्ह्यातील अधिसूचित महसूल महामंडळात आंबा, काजू पिकांच्या बागांना विमा संरक्षण देण्यात येणार आहे. कर्जदार शेतकरी व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होता येईल. खातेदार शेतकऱ्यांव्यतिरिक्त कुळ व भाडेपट्टीने शेती करणारेही योजनेचा लाभ घेऊ शकतात. एका शेतकऱ्याला चार हेक्टर क्षेत्रावर विमा नोंदणी करता येणार आहे.

अंतिम मुदत ३० नोव्हेंबर

आंबा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख ४० हजार रुपये आहे. विमा हप्ता २९ हजार ४०० रुपये व काजू पिकासाठी विमा संरक्षित रक्कम एक लाख रुपये असून विमा हप्ता पाच हजार रुपये आहे. जिल्ह्यासाठी भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत योजना राबवली जात आहे.

योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर असून योजनेचा विमा हप्ता आपले सरकार सेवा केंद्र, बँक तसेच www.pmfby.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. अधिक माहितीसाठी कृषी विभागाशी संपर्क साधावा. पीक विम्‍यासाठी फळ पिकांची नोंद सात बारा उताऱ्यावर बंधनकारक आहे. त्‍यामुळे ई-पिक ॲपद्वारे फळ पिकांच्या नोंदी करावी असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

यापासून मिळते संरक्षण

हवामान केंद्रावर पर्जन्यमान, तापमान, वादळी वारे, आर्द्रता इत्यादींची माहिती स्वयंचलितरित्या नोंदवली जाते. या माहितीच्या आधारे अवकाळी पाऊस, वादळ, गारपीटीमुळे नुकसान झाल्‍यास फळ पिकासाठी विमा संरक्षण मिळते.

लहरी हवामानामुळे आंबा, काजूच्या फळबागांना नुकसान सहन करावे लागते. हा धोका टाळण्यासाठी अधिकाधिक बागायतदारांनी फळ पीक विमा उतरवावा. कृषी विभागाकडून त्यांना सर्व सहकार्य केले जाईल.
- भरत कदम, तालुका कृषी अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Purchase Investigation : कांदा खरेदीची केंद्राकडून चौकशी सुरू

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

SCROLL FOR NEXT