Drone survey of the village started Agrowon
ॲग्रो विशेष

Drone Land Survey : ‘ड्रोन’च्या मदतीने गावठाणांना प्रॉपर्टी कार्ड

Drone survey : रायगड जिल्ह्यात गावांमध्ये ‘ड्रोन’च्या मदतीने मोजणी करून गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

Team Agrowon

Alibag News : विस्तारलेल्या गावांचा विकास साधण्यासाठी गावठाणाचे क्षेत्र निश्‍चित होणे आवश्‍यक आहे. त्यादृष्टीने जमाबंदी आयुक्त आणि भूमिअभिलेख विभागाने गावांची ‘ड्रोन’च्या मदतीने मोजणी करून गावठाणाचे डिजिटल नकाशे तयार करण्याचे काम सुरू केले आहे. या मोहिमेअंतर्गत रायगड जिल्ह्यात एक हजार ६६४ गावांचे ड्रोन सर्व्हे करण्यात आले. यातील १५० गावांच्या सनदा तयार असून ८५ गावांत सनद वाटपही झाले आहेत.  

‘ड्रोन’द्वारे मोजणी केल्याने पारंपरिक मोजणी पद्धतीपेक्षा कमी वेळेत, कमी श्रमात व कमी मनुष्यबळाचा वापर करून मोजणी होणार आहे. डिजिटल स्वरूपात अभिलेख निर्मिती केली जाणार आहे. गावातील सार्वजनिक रस्ते, सरकारी जमिनी, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाल्यांच्या सीमा निश्‍चित होऊन या मिळकतीचे अभिलेख तयार होतील. गावठाणातील मिळकतींचा मालकी हक्कांचा पुरावा तयार होणार आहे. हे काम सध्या रायगड जिल्ह्यात प्रगतिपथावर असल्याची माहिती जिल्हा भूमि अभिलेख अधिकारी सचिन इंगळी यांनी दिली.

रायगड जिल्ह्यात १५ तालुक्यांमध्ये एकूण २,१३६ महसूल गावे असून त्यापैकी १,८६७ गावठाण असलेली आहेत. यापैकी १३३ गावांमध्ये नगर भूमापन झाले असून उर्वरित १, ७३४ गावांमध्ये स्वामित्व योजनेंतर्गत गावठाण भूमापनाचे काम करण्यात येणार आहे. ज्या गावठाणांमध्ये अद्याप सर्व्हे झाले  नाहीत तिथे ड्रोनद्वारे गावठाण भूमापन केले जाईल. स्थळ निश्‍चितीसाठी जीपीएस निर्देशांकाचे संदर्भ ड्रोनला देणे आवश्‍यक आहे. सर्व्हे नंबरच्या अभिलेखांद्वारे गावठाणाच्या सीमा निश्‍चित करून पिलर लावण्यात येतील. मिळकतीचे क्षेत्र चुन्याच्या साह्याने दर्शविण्यात येईल. त्यानंतर गावठाणांचे ड्रोन छायाचित्र घेण्यात येईल. जीपीएस रीडिंग आणि ड्रोन इमेजची प्रक्रिया सर्व्हे ऑफ इंडियाच्या माध्यमातून करण्यात येईल.

मिळकतीचा नकाशा बनणार  

मोजणीमुळे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील सर्व मिळकतीच्या मालमत्ता कराची आकारणी व नियोजन करता येईल, त्यामुळे ग्रामपंचायत महसुलात वाढ होईल. मालमत्ता कर निर्धारण पत्रक आठ अ नोंदवही अद्ययावत होईल. कर आकारणी अधिक सोपी होईल. गावठाण क्षेत्रातील प्रत्येक घर आणि मिळकतींचा नकाशा तयार होईल व प्रत्येक मिळकतीच्या सीमा निश्‍चित होतील तसेच मालकी हक्काचे अभिलेख मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) तयार होईल. यामुळे गावांचा विकास आराखडा तयार करणे सुलभ जाईल.

मालमत्तेचा अधिकार पुरावा म्हणून मिळकत पत्रिका व सनद मिळाल्यामुळे मिळकतीवर कर्ज उपलब्ध होत असल्याने नागरिकांचा फायदा होत आहे. यामुळे जागेचा मालकी हक्क, तंटे, वाद तसेच जमीन खरेदी-विक्री व्यवहारातील फसवणूक टळणार आहे. पनवेल, उरण, पेण तालुका वगळता इतर तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे.
- सचिन इंगळी, अधिकारी, जिल्हा भूमि अभिलेख

१७० गावांच्या मिळकत पत्रिका तयार

जिल्ह्यात ६७१ गावांत मोजणीची कामे पूर्ण झाली आहेत.  २०७ गावांचा डाटा ईपीसीआयएस (इलेक्‍ट्रॉनिक प्रॉडक्ट कोड इन्फॉर्मेशन सर्व्हिस) आज्ञावलीत वर्ग केला आहे. १५० गावांच्या सनदा तयार केल्या असून ८५ गावांत वाटप झाले आहेत. त्‍यासाठी १५ ऑगस्टला विशेष मोहिमेचे आयोजन केली होती. आतापर्यंत १७० गावांचे मिळकत पत्रिका तयार केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Banana Crop Insurance: ‘त्या’ केळी विमाधारकांकडून खुलासे मागविणार

Banana Crop Insurance: बारड मंडळातील ३३९ केळी उत्पादकांना परतावा मंजूर

Agrowon Podcast: कांद्याचा भाव दबावातच; कापूस भाव स्थिर, मका आवक स्थिर, तूर स्थिरावली तर पपईच्या भावात उठाव

Avakali Paus: अवकाळी पावसाचा इशारा! फळबागांचे नुकसान टाळण्यासाठी करा तातडीचे व्यवस्थापन

Tapi Mega Recharge Project: तापी मेगा रिचार्ज प्रकल्पाला चालना केव्हा?

SCROLL FOR NEXT