Bhendi Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Harvesting : शेतीमाल काढणीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यास गुणवत्ता वाढते

Team Agrowon

Narayangaon News : शेतीमाल काढणीनंतर योग्य व्यवस्थापन केल्यास गुणवत्ता वाढते व बाजारभावही चांगला मिळतो. उत्पादित केलेल्या शेतीमालाचे मूल्यसंवर्धन करण्यासाठी साठवणूक, प्रतवारी, पॅकिंग, विपणन, प्रक्रिया याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. महिला शेतकरी उत्पादक संस्थांनी कृषिमूल्य साखळीतील विविध घटकांमध्ये योगदान द्यावे, असे आवाहन मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे यांनी केले.

मॅग्नेट प्रकल्पाअंतर्गत किसान कनेक्टच्या वतीने येथील कृषी विज्ञान केंद्रात भेंडी काढणीपश्चात व्यवस्थापन याविषयी दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. या निवासी प्रशिक्षणास राज्यातील महिला शेतकरी उत्पादक संस्था व मूल्य साखळी गुंतवणूकदार प्रतिनिधी उपस्थित होते. या वेळी भेंडी काढणीपश्चात व्यवस्थापन याविषयी महिलांना विविध प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.

या वेळी कृषी विज्ञान केंद्राचे प्रभारी वरिष्ठ शास्रज्ञ राहुल घाडगे, मॅग्नेट प्रकल्प व्यवस्थापन कक्षाचे प्रकल्प अधिकारी सचिन खरमाळे, प्रकल्प अंमलबजावणी कक्षाचे विभागीय प्रकल्प अधिकारी अजय कुदळे, संतोष इंगोले, मनीष मोरे, विषय विशेषज्ञ धनेश पडवळ, संतोष इंगोले, आदित्य माने यांनी महिला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

प्रकल्प संचालक कोकरे यांनी मॅग्नेट प्रकल्पाचे फलोत्पादनातील महत्त्व, विविध संधी याबाबत माहिती दिली. मॅग्नेट प्रकल्पामधील योजनेत नवीन व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानास ६० टक्क्यांपर्यंत अनुदान व खेळते भांडवल व मध्यम मुदत कर्ज स्वरूपात अर्थसाहाय्य केले जाते, अशी माहिती अतिरिक्त प्रकल्प संचालक डॉ. अमोल यादव यांनी दिली.

डॉ. बी. टी. पाटील यांनी भेंडीचे मूल्य साखळी व्यवस्थापन व कीडरोग नियंत्रण याबाबत, कष्टकरी राजा शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष नवनाथ गरुड यांनी काढणीपश्चात हाताळणी व व्यवस्थापन पद्धती, विभागीय प्रकल्प अधिकारी अजय कुदळे यांनी व्यवसायातील संधी, देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय विपणन व नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान, आयात निर्यात परवाने व पणन मंडळाच्या योजना याबाबत मार्गदर्शन केले.

किसान कनेक्ट ऑनलाइन ऑर्डर, शेतकरी निवड, जमीन निवड, शेतीमाल खरेदी, पॅकिंग, वितरण आदीबाबत मनीष मोरे यांनी माहिती दिली. सूत्रसंचालन राहुल घाडगे, आभार धनेश पडवळ यांनी मानले.

भेंडी काढणीपश्चात
व्यवस्थापन कसे करावे

काढणी : भेंडीची काढणी सकाळी किंवा संध्याकाळी करावी. या वेळी भेंडीची फळे ताजी असतात.
प्रतवारी : काढलेली भेंडी सावलीत ठेवावीत. स्वच्छ पाण्याने धुवावीत. खराब फळे वेगळी करावीत.
साठवण : भेंडी थंड आणि कोरड्या ठिकाणी साठवावी. रेफ्रिजरेटरमध्ये भेंडी ५-७ दिवस ताजी राहू शकते.
पॅकिंग : भेंडीची पॅकिंग करण्यासाठी स्वच्छ प्लॅस्टिकच्या पिशव्या किंवा बास्केटचा वापर करावा. पॅकिंग करताना फळे एकमेकांवर घासली जाऊ नयेत.

भेंडीचे उत्पादनातील महत्त्वाच्या बाबी
जमिनीची निवड : भेंडी हलक्या ते मध्यम काळ्या जमिनीत चांगली येते. जमीन चांगली निचरा होणारी असावी.
जमिनीची पीएच किंमत ६-७ असणे आवश्यक आहे.
लागवड : भेंडीची लागवड बियाणे किंवा रोपे लावून केली जाते. बियाणे पेरण्यापूर्वी कीटकनाशकात बुडवावे.
रोपे लावताना दोन रोपातील अंतर ४५-६० सेंटीमीटर असावे.
खत व्यवस्थापन : भेंडीला लागणारी खते जमिनीच्या चाचणीनुसार द्यावी.शेणखत, कंपोस्ट खत आणि रासायनिक खते यांचा योग्य प्रमाणात वापर करावा.
पाणी व्यवस्थापन : संतुलित पाण्याचा वापर करावा, जमीन ओली ठेवण्याची गरज नाही. पाणी देण्याची पद्धत जमिनीच्या प्रकारानुसार बदलू शकते.
कीड नियंत्रण: जैविक कीटकनाशकांचा वापर करून कीटक नियंत्रण
करण्याचा प्रयत्न करावा. कीटकनाशकांचा वापर करण्यापूर्वी कृषी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
रोग नियंत्रण: भेंडीला पांढरा तुडतुडे आणि इतर काही रोग येतात. रोगाच्या लक्षणांचा विचार करून उपचार करावेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage : पावसाची हजेरी नुकसान वाढविणार

Gharkul Yojana : ‘पंतप्रधान घरकुल’ मंजुरीत सातारा जिल्हा राज्यात प्रथम

Agriculture Department : कृषी सेवक कालावधी रद्द करा

Marathwada Development : मराठवाड्याची कालबद्ध प्रगती हेच ध्येय्य

Agriculture Management Techniques : हवामान बदल अनुकूल शेती व्यवस्थापन तंत्र

SCROLL FOR NEXT