Loan Scheme  Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Scheme : ‘पीडीसीसी’कडून शासनाच्या पाच कर्ज योजनांना प्रोत्साहन

PDCC Bank : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून (पीडीसीसी) कर्जाच्या पाच योजनांना प्रोत्साहन दिले आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेच्या सूत्रांनी केले आहे.

Team Agrowon

Pune News : राज्य व केंद्र शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी विविध कर्ज सवलत योजना राबविण्यात येत आहेत. मागील काही वर्षांत या योजना राबविण्याचे प्रमाण कमी होते. मात्र चालू वर्षापासून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेकडून (पीडीसीसी) कर्जाच्या पाच योजनांना प्रोत्साहन दिले आहे. या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन बँकेच्या सूत्रांनी केले आहे.

शेती आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी बॅँकेमार्फत अल्प मुदत, मध्यम मुदत कर्जपुरवठा केला जातो. त्यासाठी बँकेमार्फत निरनिराळ्या योजना राबविल्या जातात. चालू वर्षामध्ये देखील बँकेने काही नावीन्यपूर्ण योजना तयार केल्या आहेत. यात प्रामुख्याने बळीराजा मुदत कर्ज योजना, गृह कर्ज, शैक्षणिक कर्ज, सोने तारण कर्ज,

महिला स्वयंसाह्यता बचत गटांना कर्ज, पगारदार कॅश क्रेडिट कर्ज, दुचाकी कर्जाच्या योजना तयार केल्या आहेत. त्यामार्फत ग्रामीण विकासासाठी योगदान देण्याचा प्रयत्न सुरू आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये बँकेच्या वतीने विविध योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य व केंद्र शासन पुरस्कृत शेती, शेतीपूरक कारणांसाठी अनुदान किंवा व्याज सवलत योजनांसाठी जिल्ह्यातील सभासदांना प्रकल्पनिहाय जास्तीत जास्त ४० लाख रुपयांच्या मर्यादेत थेट कर्जपुरवठा करण्यात येतो.

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून शेतकऱ्यांना शेती कर्जासह, पूरक व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देण्यात येते. त्याचा अनेक शेतकरी लाभ घेत आहे. याशिवाय बँकेने काही नावीन्यपूर्ण कर्जाच्या योजना सुरू केल्या आहे. चालू वर्षापासून केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान, व्याज सवलतीच्या योजनाही बँकेमार्फत सुरू केल्या आहेत.
डॉ. दिगंबर दुर्गाडे, चेअरमन, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पुणे

केंद्र व राज्य शासनामार्फत अनुदान, व्याज सवलत योजना

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम : कृषी व कृषिपूरक सेवा व प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज पुरवठा करण्यात येतो. त्यासाठी अनुदान ३५ टक्क्यांच्या मर्यादेत आहे.

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम : सेवा व प्रक्रिया उद्योगासाठी कर्ज पुरवठा येतो. त्यासाठी अनुदान ३५ टक्क्यांच्या मर्यादेत आहे.

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ : या अंतर्गत सर्व प्रकारच्या व्यवसाय उद्योगासाठी वैयक्तिक १५ लाखांच्या मर्यादेत व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात येतो.

कृषी पायाभूत सुविधा निधी : कृषी व कृषिपूरक व्यवसाय उद्योगासाठी व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्जपुरवठा करण्यात येतो.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ : या अंतर्गत सर्व प्रकारच्या व्यवसाय उद्योगासाठी वैयक्तिक दहा लाख रुपयांच्या मर्यादेत व्याज परतावा योजनेअंतर्गत कर्ज पुरवठा करण्यात येतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Shetkari Installment : कर्जमाफीच्या लाभार्थी शेतकऱ्यांना नमोचा हप्ता बंद?; विरोधकांचा आरोप, सरकारचे मौन

LPG Price Cut Today: मोठा दिलासा; गॅस सिलिंडर २०९ रुपयांनी स्वस्त

Free Seeds Scheme : शेतकऱ्यांना मोफत बियाणे, निविष्ठांची घोषणा हवेतच

Farm Loan Waiver Helpline: कर्जमुक्ती योजनेबाबत अडचण असल्यास तक्रार कुठे करावी? महत्त्वाची माहिती

Integrated Warehouse Services: गोदाम हीच भविष्यातील बाजारपेठ

SCROLL FOR NEXT